शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या 'सेंच्युरी'नंतर बॅट अन् हेल्मेट उंचावणारा 'तो' आहे तरी कोण? एका व्हायरल फोटोची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 08:49 IST

Petrol Diesel Prices: भोपाळमध्ये पेट्रोल शंभरी पार गेल्यानंतर एकानं पेट्रोल पंप हेल्मेट आणि बॅट उंचावली. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

भोपाळ: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी ओलांडेल. भोपाळमध्ये शनिवारी पेट्रोलच्या दरानं शंभरी ओलांडली. याची माहिती पेट्रोल पंपांना रात्री ३ वाजता मिळाली. त्यामुळे पहाटेपासून पेट्रोलसाठी भोपाळवासीयांना शंभर रुपये मोजावे लागले. अर्थात हा दर प्रीमियम पेट्रोलचा आहे. (Fuel Prices Hit Century Mark In Bhopal)काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोकपेट्रोलनं शतक झळकावताच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती पेट्रोल पंपवर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवत आहे. क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर खेळाडू बॅट आणि हेल्मेट उंचावतात. त्याचप्रमाणे ही व्यक्ती पेट्रोलच्या दरानं शतक गाठल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवत आहे. फोटोतील व्यक्ती युथ काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचारपेट्रोल पंपवर बॅट आणि हेल्मेट उंचावून दाखवणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 'बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आणि कष्टानंतर अखेर पेट्रोलनं शतक साकार केलं आहे' अशी कमेंट एकानं केली आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं 'चाहते एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहेत. पण हा मैलाचा दगड आधी कोणी गाठला पाहा,' अशी भन्नाट प्रतिक्रिया दुसऱ्या व्यक्तीनं दिली आहे.भोपाळमध्ये पेट्रोलनं तिहेरी आकडा गाठताच शहरातील काही पेट्रोल पंप बंद करण्यात आले. या पेट्रोल पंपवरील यंत्रणा शंभर आणि त्याच्यापुढील दरांसाठी सज्ज नव्हती. त्यामुळेच पेट्रोलनं शंभरी गाठताच हे पेट्रोल पंप बंद करण्यात आले. मात्र अशा पेट्रोल पंपांची संख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणची यंत्रणा लवकरच अपडेट केली जाईल, अशी माहिती पंप मालक संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिली.

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप