शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'चिल्लर'गिरी! ताज हॉटेलमध्ये जेवला अन् बिल भरताना चिल्लर मोजू लागला, नेमका प्रकार काय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 11:05 IST

एका प्रसिद्धीलोलुप तरुणानं काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि बिल भरण्यासाठी चक्क चिल्लर टेबलवर मोजू लागला.

एखाद्या फाइव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो की तुम्ही बिल कसं द्याल? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? कॅश देऊ आणि रोकड नसेल तर कार्डनं बिल भरता येईल इतकं सोपं आहे. पण एका प्रसिद्धीलोलुप तरुणानं काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि बिल भरण्यासाठी चक्क चिल्लर टेबलवर मोजू लागला. कॉन्टेंट क्रिएटर सिद्धेश लोकरे यानं नुकतंच एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि बिल भरण्यासाठी चिल्लर मोजले. हा संपूर्ण प्रकाराचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. 

इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत सिद्धेश कॅप्शनमध्ये म्हणतो, “ताज हॉटेल मध्येही कांड केला यार. व्यवहार महत्त्वाचे आहेत, मग तो डॉलर्सचा असो किंवा चिल्लरचा". व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सिद्धेश सूट-बूट घालून हॉटेलमध्ये प्रवेश करतो. मग मेनू आणि ऑर्डर पाहतो. पिझ्झा आणि मॉकटेल ऑर्डर करतो. पण जेवण झाल्यावर एक पिशवी काढतो आणि त्यातून नाणी मोजायला सुरुवात करतो. थोड्या वेळाने हॉटेलचे कर्मचारी येतात आणि त्यांच्या हातात तो हे चिल्लर सोपवतो.

व्हिडिओला ११ लाख व्ह्यूजकाही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तो शेअर केल्यापासून ११ लाख वेळा पाहिला गेला आहे आणि संख्या वाढतच आहे. आतापर्यंत १.२५ लाख लोकांनी लाइक केलं आहे. तसेच, अनेक कमेंट्स आल्या आहेत. काही लोकांनी त्याचा हा प्रयोग 'मनोरंजक' असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ शकते असं म्हणत टीका केली आहे. 

अनेकांनी व्यक्त केली नाराजीएका व्यक्तीनं म्हटलं की, तुम्ही तुमच्या प्रयोगासाठी लोकांवर कसा त्रास देऊ शकता? पण शेवटी स्टाफला काही फरक पडला नाही, हे पाहून मला खूप आनंद झाला. दुसऱ्याने लिहिलं की, सर्व काही ठीक आहे पण नाणी मोजणं कर्मचाऱ्यांसाठी योग्य नाही. मला आशा आहे की तुम्ही याबद्दल माफी मागितली असेल. तुम्ही स्वतंत्र आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणासाठीही अडचणी निर्माण कराल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल