शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

Coffee Date with Cats Viral Video: किती गोडssss ...... तीन मांजरींना घेऊन तरूणाने साजरी केली, अनोखी 'कॉफी डेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 15:22 IST

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

Coffee Date with Cats Viral Video: आजकाल गावाकडल्या लोकांप्रमाणेच शहरात जाणाऱ्या लोकांमध्येही एखादा प्राणी पाळण्याचा ट्रेंड दिसून येतो. तुमच्याही घरात एखादे पाळीव प्राणी असेल तर तुम्हाला ते खूप आवडत असेल. लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याप्रमाणे वागवतात. उन्हाळा असो किंवा हिवाळा, ते त्यांची पूर्ण काळजी घेतात. त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातात. पण तुम्ही कधी त्यांना डेटवर घेऊन जाण्याचा विचार केला आहे का? अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या तीन मांजरींना कॉफी डेटवर नेले होते. स्पंज केक, मोका आणि डोनट अशी या मांजरींची नावे आहेत. कॅट डेटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जवळपास पाच लाख युजर्सनी दाखवली पसंती

या व्हिडिओला इंस्टाग्रामवर सुमारे पाच लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये तो माणूस त्याच्या तीन मांजरींसोबत एका ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. तिन्ही मांजरींनी छानपैकी लोकरीचे कपडे घातले आहेत आणि त्यात खात-पीत आहेत. हा क्यूट व्हिडिओवर, "न्यूयॉर्कमध्ये कॉफी डेटमध्ये सहभागी व्हायचे आहे?" हॅपी कॅटरडे”, असे कॅप्शनही देण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ यूजरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.

यूजर्स व्हिडिओवर खूप प्रेम करताना दिसत आहेत!

एका युजरने कमेंट केली आहे, "माझ्यासाठीही जागा ठेवा, मी आलोच". त्याच वेळी, आणखी एका युजरने म्हटले, "माझ्याकडे मांजर असते तर एका जागी बसण्याऐवजी ते संपूर्ण शहरात फिरायला गेलं असतं आणि कदाचित पाच मिनिटांत तिला बसने धडकदेखील दिली असती." युजर्सने छान कमेंट्स करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि मांजरींवर खूप प्रेम व्यक्त केले आहे. "जेव्हा तुम्ही या मांजरींना स्ट्रोलरमध्ये ठेवता तेव्हा त्या पळून जात नाहीत का?" असा आश्चर्य वाटणारा प्रश्न एकाने विचारला आहे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने सांगितले की माझा मुलगा हा व्हिडीओ पाहून खूप हसला, आम्ही तुम्हाला कधी भेटू, मला या मांजरींना पाहायचे आहे." अशा अनेक कमेंट्सने लोकांनी व्हिडीओवर खूप प्रेम केले आहे.