शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: विमान हजार फुटांवर असताना आयफोन पडला अन् 'लय भारी' व्हिडिओ रेकॉर्ड झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 07:27 IST

रियो डि जनेरोवरून उड्डाण करतेवेळी आयफोन हातातून निसटला

हातातून मोबाईल पडल्यावर अनेकांचा जीव टांगणीला लागतो. फोन सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर, तशी खात्री पटल्यानंतरच जीव भांड्यात पडतो. त्यातही फोन महागडा असेल, तर मग विचारायलाच नको. फोनला काही होऊ नये यासाठी त्याला जीवापाड जपलं जातं. तो पडू नये यासाठी शक्य तितकी सर्व काळजी घेतली जाते. मात्र तरीही कधीतरी फोन हातून निसटतोच आणि मग जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो.ब्राझीलचे डॉक्युमेंटरी फिल्ममेकर इर्नेस्टो गॅलिओट्टो यांनी नुकताच असाच एक अनुभव घेतला. गॅलिओट्टो छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्यांचा आयफोन खाली पडला. गॅलिओट्टो विमानाच्या खिडकीतून व्हिडिओ काढतेवेळी हवेचा वेग अतिशय जास्त होता. त्यामुळे त्यांच्या हातून फोन निसटला. गॅलिओट्टो रिओ डि जनेरोतील कॅबो फ्रियो बीचवरून उड्डाण करत असताना हा प्रकार घडला.विहंगम दृश्यं टिपण्यासाठी बाहेर काढलेला आयफोन ६ एस हातातून पडताच गॅलिओट्टोंना चिंता वाटू लागली. इतक्या उंचावरून पडलेला फोन आता कसा मिळणार आणि मिळालाच तर त्याची अवस्था काय असेल, याचा विचार त्यांच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यात गॅलिओट्टो यांच्या मनाची घालमेल अगदी स्पष्ट दिसत आहे.तीनशे मीटरवरून (९८४ फूट) खाली पडलेला फोन शोधण्यासाठी गॅलिओट्टो यांनी जीपीएसचा आधार घेतला. त्यातून त्यांना फोनचं लोकेशन समजलं. गॅलिओट्टो लगेच त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना सुखद धक्काच बसला. गॅलिओट्टो यांचा फोन उत्तम स्थितीत होता. स्क्रिन प्रोटेक्टर आणि कव्हरचं थोडं नुकसान झालं होतं. मात्र फोन व्यवस्थित सुरू होता. विशेष म्हणजे फोन खाली पडतानाचा व्हिडीओ त्यात रेकॉर्डदेखील झाला होता.