शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाईन प्यायली, 'गर्लफ्रेंड'सोबत रोमँटिक डिनर केला अन् बिल आलं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:54 IST

सोशल मीडिया युजर्संनी पब मालकाकडे या जोडप्याचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी केली.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एक जोडपे एका पबमध्ये रोमँटिक डेटवर गेले होते. या जोडप्याने जेवण केले आणि वाईन प्यायली, ज्याचे बिल जवळपास 18 हजार रुपये झाले. मात्र, या जोडप्याने पबमध्ये मध्ये पैसे दिले नाही आणि तेथून पळ काढला. यानंतर पबच्या मालकाने फेसबुकची मदत घेत जोडप्याचे बिल सार्वजनिक केले. यासोबतच हे बिलही विहित मुदतीत देण्याचे आदेश दिले होते. 

ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. दरम्यान, सोशल मीडिया युजर्संनी पब मालकाकडे या जोडप्याचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी केली. डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना यूकेच्या नॉर्थ यॉर्कशायरमधील आहे. या ठिकाणी असलेल्या 'द मिल' नावाच्या पबने या जोडप्याचे बिल सार्वजनिक केले. हे बिल दोन भागात होते. या जोडप्याने थाई ग्रीन करी, 4 वाईनच्या बाटल्या आणि इतर वस्तू घेतल्या होत्या. मात्र, या बिलावर नाव नव्हते. 

दरम्यान, हे बिल 16 फेब्रुवारीला एका महिलेने येऊन भरल्याचे पबच्यावतीने नंतर सांगण्यात आले. ती त्या तरुणाची मैत्रीण असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, पबच्या कर्मचाऱ्यांनीही संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र त्या व्यक्तीने उत्तर दिले की, आपल्याकडे अद्याप पैसे नाहीत आणि पगार मिळताच बिल भरेन. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात व्हॅलेंटाईन डेपासून झाली. जेव्हा एका जोडप्याने रोमँटिक डेटसाठी टेबल बुक केले होते. मात्र या जोडप्याने बिल दिले नाही. 

यादरम्यान 'द मिल'च्या फेसबुक पेजवरून ही चूक तुमच्याकडून जाणूनबुजून झाली नसल्याचा आम्हाला विश्वास असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दुपारी 4 वाजेपर्यंत येऊन बिल भरा, असे सांगण्यात आले.  यानंतर 'द मिल'ने आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, लोक आणि पोलीस विचारत आहेत की बिल भरले आहे का? पण आम्ही वाट पाहत आहोत. दरम्यान, 16 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेने बिल भरले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलhotelहॉटेलJara hatkeजरा हटके