शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माझं डेथ सर्टिफिकेट हरवलंय, सोशल मीडियावर ती जाहिरात होतेय व्हायरल, नेमका काय प्रकार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:06 IST

आपल्याकडे वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात छापून येत असतात. यात घर भाड्याने देण्याच्या असतात, तर नोकरीसाठीही असतात. सध्या मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच जाहिरात व्हायरल झाली आहे.

नवी दिल्ली : आपल्याकडे वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात छापून येत असतात. यात घर भाड्याने देण्याच्या असतात, तर नोकरीसाठीही असतात. सध्या मात्र सोशल मीडियावर एक वेगळीच जाहिरात व्हायरल झाली आहे. ही जाहिरात वाचून नेटकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एका व्यक्तीने आपले स्वत:चे मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याची जाहिरात दिली आहे, आणि ते प्रमाणपत्र सापडल्यास परत करण्याची माहिती त्याने यात दिली आहे. 

एखादा जीवंत व्यक्ती स्वत:चे मृत्यू प्रमाणपत्र कसे काय बनवू शकतो, यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तो व्यक्ती प्रमाणपत्र हरवल्याची जाहिरात वर्तमानपत्रात कशी देवू शकतो यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त करत, आपल्या देशात काहीही घडू शकते अशा कमेंट केल्या आहेत. 

Model Phone Auction: मॉडेलला विकायचा होता जुना फोन, 'ती' गोष्ट समजताच लोकांनी लावली लाखोंची बोली

जाहिरातमध्ये काय म्हटले आहे?

आसाम मधील एका वर्तमान पत्रात ही जाहिरात छापून आली आहे.आसाम मधील  सिमुलतला,लमडिंग येथील रहिवासी रणजीत कुमार चक्रवर्ती यांनी ही जाहिरात दिली आहे. ''माझ्याकडून ७ सप्टेंबर २०२२ रोजी लामडिंग बाजार मध्ये माझे मृत्यू प्रमाणपत्र हरवले आहे. हे प्रमाणपत्र सकाळी १० वाजता हरवले आहे. यासह मृत्यू प्रमाणपत्राचा रजिस्टर नंबरसह आपले नाव यात दिले आहे. 

समुद्रात सापडले 1300 वर्षे जुने व्यापारी जहाज, त्यात सापडलेल्या 200 भांड्यात नेमकं काय? पहा फोटो...

या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी वर्तमानपत्राचीही जोरदार खिल्ली उडवली आहे. नोटकऱ्यांनी याच्या मीम्सही बनवल्या आहेत. ही जाहिरात एका आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विट केले आहे. ''इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया, असं ट्विट त्यांनी केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी  यावर मीम्स शएृेअर केल्या आहेत. यात एका नेटकऱ्याना म्हटले आहे की, या व्यक्तीने स्वर्गातून मृत्यू प्रमाणपत्र गमावल्याची तक्रार केली आहे का. तर दुसऱ्याने, यांना हरवलेले मृत्यू प्रमाणपत्र मिळाले तरी ते द्यायचे कुठे, असा प्रश्न केला आहे.