शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्प्युटरचा कॅमेरा बंद करायला विसरला अन् मित्रासोबत पत्नीचे अश्लील चाळे कॅमेरात झाले कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:02 IST

इथे एक व्यक्ती ऑफिसला जाताना घरातील डेस्कटॉपचा कॅमेरा बंद करायला विसरला, पण नंतर जेव्हा त्याने डेस्कटॉपचा वापर केला.

(Image Credit : SHANGYOU NEWS/WEIBO)

उत्तर-पूर्व चीनच्या मुडानजिआंग शहरात एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती ऑफिसला जाताना घरातील डेस्कटॉपचा कॅमेरा बंद करायला विसरला, पण नंतर जेव्हा त्याने डेस्कटॉपचा वापर केला तेव्हा कॅमेरातील कैद फुटेज पाहून त्याला धक्का बसला. त्याची पत्नी त्याच्याच एका मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीत कॅमेरात कैद झाली होती. 

ही घटना यांग या व्यक्तीसोबत घडली. त्याने सांगितले की, हा व्हिडीओ २०१६ मध्ये रेकॉर्ड झाला होता. पण व्हिडीओ समोर आल्यापासूनचं त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार तयारीही सुरु केली होती. २०१८ मध्ये व्यभिचारपूर्ण व्यवहाराचा आरोप करत दोघांचा घटस्फोट झाला.

यांगने या घटनेबाबत मीडियाला माहिती देताना सांगितले की, त्या दिवशी त्याला वाटले होते की त्याचा सिस्टम कॅमेरा खराब झाला आहे, त्यामुळे त्याने तो बंदच केला नाही. पण कॅमेरा सुरुच होता. ज्यात त्याची पत्नी आणि त्याचा जवळचा मित्र अश्लिल वर्तन करताना रेकॉर्ड झालेत. 

यांगने आरोप लावला की, त्याच्या पत्नीचं त्याच्या मित्रासोबत अफेअर सुरु होतं. यांग म्हणाला की, माजी मेअर मिस्टर लिऊ जो माझे चांगले मित्र होते आणि नियमितपणे त्यांचं घरी येणं-जाणं सुरु होतं. यादरम्यान पत्नीसोबत लिऊची भेट झाली होती. त्यानंतर त्याची पत्नी लिऊसोबत काम करु लागली. 

मात्र, यांगच्या पत्नीने हे सगळे आरोप फेटाळले होते. कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ केवळ एक दुर्घटना होती. यांगने आरोप केला की, या व्हिडीओमुळे त्याचं आयुष्य उद्धस्त झालं. दोघांच्याही लग्नाला २० वर्षे झाली होती. यांगने त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातही शेअर केला होता. 

यांगचं म्हणणं आहे की, त्याला आधीच पत्नीवर संशय होता की, तिची लिऊसोबत अफेअर सुरू आहे. यांगने स्थानिक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती, पण त्यावर काही कारवाई झाली नव्हती. या सर्व प्रकारावर यांगच्या पत्नीने सांगितले की, लिऊ घटनेच्या दिवशी नशेत होता आणि त्यामुळे असं झालं. असं केवळ एकदाच झालं होतं. तसेच या महिलेने आरोप केला की, हा व्हिडीओ डेस्कटॉप कॅमेराने नाही तर एखाद्या सीक्रेट कॅमेराने शूट केला गेला होता. 

टॅग्स :chinaचीनDivorceघटस्फोट