शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

By मोरेश्वर येरम | Updated: December 22, 2020 13:48 IST

एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही.

क्वालालंपूरकोरोनाच्या संकटात जगातील बहुतांश देशात लग्न समारंभांला पाहुण्यांच्या उपस्थितीवर निर्बंध असताना मलेशियात मात्र एका राजेशाही लग्नात तब्बल १० हजार जण उपस्थित होते. 

मलेशियात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. यात लग्न समारंभात केवळ २० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. असं असतानाही एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही. त्यामुळेच या लग्न सोहळ्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. 

मलेशियाची राजनाधी क्वालालंपूर येथील मोठे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री टेंग्कू अदनान यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा होता. मंत्र्याच्या मुलाचं लग्न म्हटलं म्हणजे राजेशाही थाट आणि गर्दी होणारच. या लग्नाला १० हजार लोक उपस्थित होते. पण कोणत्याही नियमाचा भंग झाला नाही. असं कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

त्याचं झालं असं की, लग्नाला उपस्थित राहण्यासाठी निर्धारित लोकांव्यतिरिक्त इतर कुणीही उपस्थित राहून एका ठिकाणी गर्दी केली नाही. नवदाम्पत्य रस्त्याच्या एका बाजूला उभं होतं आणि येणारा प्रत्येक पाहुणा कारमधून खाली न उतरताच दाम्पत्याला शुभेच्छा देऊन निघून जात होता. यामुळे पाहुण्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देखील दिले आणि कोणत्याही नियमाचा भंग देखील झाला नाही. 

असं झालं रिसेप्शनक्वालालंपूरमध्ये रविवारी एका सरकारी भवनामध्ये विवाह संपन्न झाला. त्यानंतर धीम्या गतीनं चालणाऱ्या कारमधून प्रत्येक पाहुण्याने नवरदेव टेंग्कू मोहम्मद हाफिज आणि वधू ओसियन अलेगिया यांना आशीर्वाद दिले. कारच्या काचा खाली करण्यात आल्या होत्या आणि कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाने मास्क घातला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन झालं आणि नियम मोडता सर्वांना लग्नाला उपस्थित राहता आलं. या अनोख्या प्रकारामुळेच संपूर्ण जगात या लग्न सोहळ्याची चर्चा होत आहे. 

जेवणंही कारमध्येचलग्न सोहळ्याला १० हजार लोक येणार असल्याची कल्पना आम्हाला आधीपासूनच होती, असं टेंग्कू अदनान यांनी सांगितलं. "लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा उत्साह पाहून मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कारमधून न उतरता नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आणि नियम भंग होणार नाही याची काळजी घेतली. याचा मला आनंद आहे", असं टेंग्कू अदनान म्हणाले. लग्न सोहळ्यातून सर्व कार मार्गस्थ होण्यासाठी तब्बल तीन तासांचा वेळ लागला. यावेळी लग्नात भोजन समारंभ आयोजित न करता थेट कारमध्येच प्रत्येकाला जेवणाच्या पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Malaysiaमलेशियाcorona virusकोरोना वायरस बातम्या