शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

700 रुपयांत थार? आनंद महिंद्रा म्हणाले, असे तर आमचे दिवाळे निघेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:18 IST

सेकंड हँड कारच्या किंमती चार-पाच वर्षांपूर्वीच्या नव्या कारच्या किंमतीएवढ्या झाल्या आहेत. असे असताना तरुणाईच  नाही तर बालबच्च्यांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली महिंद्राची थार ही ऑफरोड एसयुव्ही जर ७०० रुपयांत मिळाली तर... 

आजकाल कारच्या किंमती आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. इंधन तर कधीचेच आवाक्याबाहेर गेले आहे, पण कारही सामान्यांना घेणे परवडणारे राहिलेले नाहीय. सेकंड हँड कारच्या किंमती चार-पाच वर्षांपूर्वीच्या नव्या कारच्या किंमतीएवढ्या झाल्या आहेत. असे असताना तरुणाईच  नाही तर बालबच्च्यांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली महिंद्राची थार ही ऑफरोड एसयुव्ही जर ७०० रुपयांत मिळाली तर... 

आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये चिकू नावाचा मुलगा त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरील रीलमध्ये ७०० रुपयांत थार देण्याची मागणी करत आहे. या मुलाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांना त्याच्या एका निकटवर्तीयाने पाठविला होता. यावर आनंद महिंद्रांनी या चिकुचे इन्स्टावरील अन्य व्हिडीओ देखील पाहिले आणि ते त्याच्या प्रेमातही पडले आहेत. परंतु, आनंद महिंद्रा चिकुला ७०० रुपयांत कार देणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर नेटकऱ्यांनीही आनंद महिंद्रांकडे चिकुचा हट्ट पूर्ण करण्याचा ठेका धरला आहे. 

आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओवर ७०० रुपयांत थार दिली तर लवकरच आमचे दिवाळे निघेल असे म्हटले आहे. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट X वर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले - माझ्या एका मैत्रिणीने मला हा व्हिडिओ पाठवला आणि सांगितले - तिला चिकू आवडतो. ...म्हणून मी त्याचे काही व्हिडिओ Instagram (@cheekuthenoidakid) वर पाहिले आणि आता मी ही त्याच्या प्रेमात पडलो आहे! पण माझी एकच अडचण आहे की आम्ही महिंद्रा थार 700 रुपयांना विकायला सुरुवात केली तरी आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ.

आनंद महिंद्रांच्या या पोस्टला आतापर्यंत 3 लाख 46 हजार व्ह्यूज आणि सात हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर शेकडो युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्रा