शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Viral Video: झेब्र्यांनी सिंहाला अक्षरश: जेरीस आणले! पाहा या लढाईत शेवटी कोण जिंकलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:34 IST

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात साध्या झेब्राने शिकार करायला आलेल्या सिंहाची भयानक अवस्था केली आहे.

जंगलाचा राजा सिंह... ज्याला माणसंच नाही तर जंगलातील बहुतेक प्राणी घाबरतात. कारण त्याच्या बलाढ्य ताकदीसमोर कुणाचाच टिकाव लागत नाही. पण जर विचार केला तर काहीही शक्य आहे. सिंहासारख्या शक्तिशाली प्राण्यावरही साधे प्राणी भारी पडू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात साध्या झेब्राने शिकार करायला आलेल्या सिंहाची भयानक अवस्था केली आहे (Lions gets stampeded by zebras video).

काही सिंह झेब्राच्या कळपाला पाहून त्यांची शिकार करायला आले. पण सिंहाला वाटली तितकी ही सोपी शिकार नव्हती. कारण झेब्रा एकटा नव्हता तर त्यांचा कळप होता. एकीचं बळ काय असतं हे या झेब्रांनी सिंहाला दाखवून दिलं. एकत्र येत त्यांनी सिंहाचीची अक्षरशः वाट लावून टाकली आहे.  मसाई साइटिंग्स यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आफ्रिकेच्या सेरेंगेट नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता झेब्रांचा कळप दिसत आहे. त्यांची शिकार करण्यासाठी काही सिंह तिथं येतात. एक सिंह एका झेब्रावर हल्ला करते तेव्हा इतर सर्व झेब्रा आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळतात. झेब्रांचा कळपच्या कळप धावत सुटतो. सिंह त्या कळपात जाऊन झेब्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण झेब्रा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटतात ते थांबतच नाहीत. सिंह झेब्राला धरायला जातेच काही झेब्रा तिला लाथ मारून उडवतानाही दिसतात. सिंहाला तुडवतच सर्वजण निघून जातात.

थोडा वेळ तिथं काहीच दिसत नाही. झेब्रा वेगाने पळत गेल्याने माती उडाली आहे. त्यामुळे सर्वत्र धूळच धूळ दिसते. काही वेळाने सर्वकाही स्पष्ट होतं. इतक्या झेब्रांनी तुडवल्यानंतर सिंहाची काय अवस्था झाली असेल, याचा विचारही करायला नको. पण इथं जे चित्र दिसतं ते पाहून धक्काच बसतो. कारण तो सिंह चक्क जिवंत होता. त्याला काहीच झालेलं दिसत नाही. पण इतके झेब्रा अंगावरून गेल्यानंतर त्याला दुखापत नक्कीच झाली असावी.

शेवटी इतक्या झेब्रांच्या कळपातून दोन झेब्रांना पकडण्यात या सिंहांना यश मिळालं. दोघांना त्यांनी आपली शिकार बनवली आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब