शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सिंहाने कुत्र्याच्या पायाला किस केलं, माफी मागून करु लागला गयावया! पाहुन तुम्ही म्हणाल पहावं ते नवलंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:22 IST

सध्या सोशल मीडियावर सिंह आणि डॉगचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही(Dog Lion love story video). सिंह आणि श्वानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे (Lion dog video viral).

कुत्रा आणि सिंह आमनेसामने आलं तर काय होईल? असं विचारलं तर साहजिकच कुणीही सिंह त्या श्वानाची शिकार करेल असं म्हणेल. कारण जंगलाचा राजा सिंहाचा आतापर्यंत आपण हिंसक रूपच पाहत आलो आहोत (Animal video viral). पण सध्या सोशल मीडियावर सिंह आणि डॉगचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही(Dog Lion love story video). सिंह आणि श्वानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे (Lion dog video viral).

जंगलाचा राजा सिंह सिंह चक्क श्वानाच्या प्रेमात पडला आहे.  सिंह आणि श्वानाच्या या अनोख्या लव्हस्टोरीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   व्हिडीओत पाहू शकता एक श्वान एका ठिकाणी उभा आहे. इतक्यात एक भलामोठा सिंह तिथं येतो. पण तरी श्वान त्याला घाबरत नाही. तो तिथंच त्याच्यासमोर उभा राहतो. आता हा सिंह या श्वानाची शिकार करणार असंच आपल्याला वाटतं. पण पुढे जे घडतं त्याचा विचार आपण कधी स्वप्नातही केला नसेल. सिंह त्या श्वानाचा हात आपल्या हातात घेतो आणि श्वानाच्या हातावर किस करतो. त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावरही शिकारीची हिंसक भावना नव्हे तर प्रेम दिसून येतो. श्वानाकडे अगदी तो प्रेमाने पाहतो. त्यानंतर श्वानही प्रेमाने आपली शेपटी हलवतो.  त्यानंतर तो तिथून निघून जातो. तसा सिंहही त्याच्या मागे मागे धावत जातो. याच्या पुढे नेमकं काय झालं हे मात्र या व्हिडीओत दिसत नाही.

असे श्वान आणि सिंहाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. ज्यात सिंहाने श्वानाची शिकार केल्याचं किंवा अगदी याच्या उलट म्हणजे शिकार करायला आलेल्या सिंहाला श्वानाने भुंकून भुंकून पळवून लावल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. पण श्वान आणि सिंह यांच्यातील मैत्री, प्रेमाचं दृश्य मात्र नक्कीच पाहिलं नसेल.

यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या कॅप्शननुसार सिंह श्वानाची माफी मागतो आहे. पण नेमकी तो माफी का मागतो हे मात्र सांगितलेलं नाही.

हा व्हिडीओ मेक्सिकोतील ब्लॅक जॅगुआर व्हाइट टायगर फाऊंडेशनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. श्वान आणि सिंह लहानपणापासून मित्र असल्याचं सांगितलं जातं आहे. सिंहाचं नाव मिकी आणि श्वानाचं नाव कॅमेलिया आहे. हा व्हिडीओ खूप जुना आहे. पण आता पुन्हा व्हायरल होतो आहे.

 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया