शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

आजोबांचा मृत्यू झाला, मुलीला परीक्षेला उशीर, पोलीस आले अन् कॉरीडॉर बनवून वेळेत पोहोचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:17 IST

पोलिसांचे कौतुक होत आहे.

आपल्याकडे शहरात गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आली तर आपण लगेच त्याला रस्ता देत असतो. सगळी वाहने बाजूला होऊन रुग्णवाहिकेला रस्ता देतात. सोशल मीडियावर या संदर्भातील घटना व्हायरल होतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पण या घटनेत रस्ता रुग्णवाहिकेला नाही तर हा रस्ता परीक्षेला जाणाऱ्या  विद्यार्थीनीला दिला आहे. या घटने पोलिसांनी मोठ्या गष्टाने त्या विद्यार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवले आहे. दरम्यान, पोलिसांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

कोलकाता येथील कवेळा पोलीस आपल्या कामामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. आता असाच काहीसा प्रकार कोलकाता पोलिसांबाबत घडला आहे. कोलकाता पोलीस इन्स्पेक्टरने एका मुलीला तिच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवला. एका मुलीला परीक्षेला उशीर झाला होता. ती रडायला लागली. तिला पाहून कोलकाता पोलिसांनी इन्स्पेक्टरने तिला ताबडतोब आपल्या कारमध्ये बसवले आणि तिला परीक्षा केंद्रावर पोहोचवले. ही घटना पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली. 

कोलकाता पोलिसांनी 25 फेब्रुवारी रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हे शेअर करताना कोलकाता पोलिसांनी लिहिले की, आज सकाळी 11.20 वाजता हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात इन्स्पेक्टर सौविक चक्रवर्ती राजा कटराजवळील स्ट्रँड रोडवर गस्त घालत होते. त्यांनी पाहिले की एक लहान मुलगी रडत आहे आणि लोकांना मदतीसाठी विचारत आहे. चौकशी केली असता ती माध्यमिक परीक्षार्थी असून तिचे परीक्षा केंद्र श्याम बाजार येथील आदर्श शिक्षा निकेतन असल्याचे लक्षात आले. या विद्यार्थीनीचे घर एनएस रोडवर होते. या मुलीच्या आजोबांचे निधन झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य अंत्यविधीसाठी गेले होते. यामुळे ती एकटी होती यामुळे तिला परीक्षेला जायला उशीर झाला.

पोलिसांनी लिहिले की, ती मदत मागण्यासाठी इकडे-तिकडे धावत होती. तिची अवस्था पाहून शौविकने लगेच तिला आपल्या अधिकृत वाहनात बसवले. वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवून ग्रीन कॉरिडॉर करून परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यात आले. सकाळी 11.30 वाजता ते परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्राचे दरवाजे उघडताच लगेच. इन्स्पेक्टरनेही त्या मुलीला बेस्ट ऑफ लक म्हटले. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. लोक या पोलिसाचे कौतुक करत आहेत. पोलिसांनी सर्वसामान्यांशी असेच नाते ठेवावे, अशा कमेंट येत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षा