शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कुकरचं झाकण, शिटी खराब होऊ न देणारी खास आयडिया, बघून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:02 IST

Kitchen Hacks : कुकर लावताना प्रेशरमुळे आतील पाणी किंवा डाळ छाकणावर पसरते. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. मात्र, सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Kitchen Hacks : आजकाल सर्रासपणे किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. कारण याने लवकर जेवण तयार होतं. मात्र, अनेकदा शिटीसोबतच कुकरचं झाकणही खराब होतं. कारण कुकर लावताना प्रेशरमुळे आतील पाणी किंवा डाळ छाकणावर पसरते. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. मात्र, सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, गॅसवर कुकर ठेवलेला आहे. एक महिला शिटी वर करून त्यावर मोहरीचं तेल टाकत आहे. तसेच झाकणाचा रिंग काढून तिथेही तेल लावत आहे. तेल लावल्यावर शिटी आणि रिंग पुन्हा लावून कुकर गॅसवर ठेवत आहे. महत्वाची बाब म्हणजे तेल लावल्यानंतर शिटी जेव्हा वाजते तेव्हा कुकरचं झाकणं अजिबात खराब होत नाही.

कुकर खराब होण्यापासून रोखण्यासाठी ही एक चांगली ट्रिक आहे. याच कारणाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. इन्स्टावर हा व्हिडीओ @ayurvedahealthstudio हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

अनेक यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'याहूनही चांगला उपाय म्हणजे कुकरमध्ये पाणी योग्य प्रमाणात टाका. ते बाहेर येणार नाही'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'तेल टाकल्याने कुकरमध्ये स्फोट होऊ शकतो'. तिसऱ्याने लिहिलं की, 'चुकून जर तेल नोजलमध्ये अडकलं तर राम राम सत्य होईल'. अनेकांना ही आयडिया आवडली सुद्धा आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके