शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

VIDEO: महिलेचा युटर्न लोकांना पडला भारी; १० बस धडकल्या अन् ट्रॅफिक जॅम वेगळंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:01 IST

केरळमध्ये एका स्कूटीवरील महिलेने चुकीच्या पद्धतीने युटर्न घेण्याचा प्रयत्न केल्याने अनेक वाहनांचा अपघात झाला.

Kerala Accident: केरळमध्ये चुकीच्या पद्धतीने युटर्न घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना समोर आली आहे.  एका बसच्या डॅशकॅममध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये स्कूटरवरील एक महिला चुकीच्या पद्धतीने युटर्न घेत असल्याचे दिसून येते. त्यावेळी मागून येणाऱ्या गाडीची तिला धडक बसते. त्यानंतर बस थांबल्याने मागून येणाऱ्या बस एकमेकांवर आदळल्या आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातामुळे, बस प्रवाशांना खाली उतरून पायी प्रवास करावा लागला.

२७ जानेवारी रोजी ही घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची येथील विटिला परिसरात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्कूटी चालवणाऱ्या महिलेमुळे तब्बल नऊ ते १० वाहनं एकमेकांना धकडली असून त्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. मात्र महिलेच्या एका चुकीमुळे इतक्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागल्यामुळे सोशल मीडियावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये स्कूटरवरील एक महिला रस्त्याच्या मधोमध युटर्न घेताना दिसत आहे. त्यावेळी समोरुन बाईकवरुन येणारी एक व्यक्ती महिलेला वाचवण्यासाठी ब्रेक लावतो. मात्र मागच्या बसने बाईकला धडक दिल्याने स्कूटीवरील महिला खाली पडले. खाजगी बसने ब्रेक लावल्याने मागून येणार्‍या शाळेच्या बस एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये खासगी बससह शाळेच्या बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

महिलेकडून नुकसान भरपाई घ्या; नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

"महिलेची स्कूटी जप्त करा आणि तिचे लायसन्स रद्द करा. या महिलेकडून सर्व नुकसान भरपाई घ्या. जर आपण अशा लोकांबद्दल सौम्य भूमिका घेतली तर ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत. या घटनेनंतर त्या महिलेला कोणताही पश्चात्ताप नव्हता आणि ती एखाद्या हिरोईनसारखी पाहत होती," असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. "त्या महिलेला इतक्या जीवांना धोका निर्माण केल्याबद्दल तुरुंगात टाका आणि तिच्याकडून सर्व नुकसान भरपाईचे पैसे घ्या," अशी मागणी एका नेटकऱ्याने केली. तर "महिलेला रस्ता ओलांडण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. पलक्कडमध्ये अनेक वेळा पाहिले आहे. ते फक्त रस्ते ओलांडतात किंवा यू टर्न घेतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नेहमीप्रमाणे घाईत असतात," असंही एका नेटकऱ्याने म्हटलं.

टॅग्स :KeralaकेरळSocial Viralसोशल व्हायरल