Kerala man builds home with garage scraps video: केरळमधील एका रायडिंग फॅन आपल्या क्रिएटिव्हिटीनं गॅरेजमधील जुन्या आणि टाकावू वस्तुंचा वापर करत आपलं घर सुंदर बनवलं आहे. कंन्टेन्ट क्रिएटर प्रियंम सरस्वतने या अनोख्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे अॅम्बेसेडर कारचा वापर बसण्यासाठी केला जात आहे. तर घराच्या खिडक्या जुन्या टायरपासून बनवण्यात आल्या आहेत. तसेच बजाज स्कूटरच्या हेडलाईटचा वापरही इथे करण्यात आला आहे.
या घरात एका बाइक इंजिनचा टेबल म्हणून तर जुन्या स्कूटरचा सोफ्यासारखा वापर केला जात आहे. त्याशिवाय स्विफ्ट कारच्या प्रेशर प्लेटनं घड्याळ आणि बायसिकल रिमपासून लाइट बनवला आहे. तसेच किचनमध्ये स्क्रॅप पार्ट्सपासून बनवण्यात आलेला एक ग्लास टेबल, फ्यूल नोजलपासून वॉश बेसिन आणि स्टीअरिंग व्हीलपासून हॉवेल होल्डर तयार केलं आहे. त्याशिवाय घरातील फ्रीजही कारच्या पार्ट्सपासून बनवला आहे.
व्हिडिओत व्यक्तीनं आपल्या या अनोख्या घराबाबत सांगितलं की, "मी एक जेसीबी ऑपरेटर होतो आणि माझ्याकडे घर बनवण्यासाठी खूप कमी पैसे होते. पण ऑटोमोबाइलच्या प्रेमानं मला हे कमाल घर बनवण्यासाठी प्रेरित केलं. बालपणी ना माझ्याकडे बाईक होती, ना कार. पण मी ते बरोबर करणं शिकलो होतो. माझं स्वत:चं गॅरेज आहे".
हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. लोक कमेंट करून व्यक्तीचं भरभरून कौतुक करत आहेत. एकानं लिहिलं की, 'हे घर फारच सुंदर आहे.