शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

KBC: 2 हजार रुपयांच्या नोटेत GPS सिस्टीम, KBC च्या प्रश्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:20 IST

‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नवीन नोटा बाजारात येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. यावेळी, एका वृत्तवाहिनीच्या निवेदकांनी चर्चा करताना 2 हजार रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याचं सांगितलं होतं. या बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता, पुन्हा एकदा त्या व्हिडिओची चर्चा होत आहे. कारण, बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये एक प्रश्न विचारला. त्यावर, हॉट सीटवरील सहभागी महिलाने दिलेल्या उत्तराने अनेकांना हसू आवरेना.  

कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या, हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या प्रोमोमध्ये चुकीची बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांनी टोला लगावल्याचे दिसून येते. प्रोमोच्या सुरुवातीला अमिताभ हॉट सीटवरील स्पर्धकाला प्रश्न विचारतात की, यापैकी कशात जीपीएस ट्रॅकर आहे. अर्थातच, या प्रश्नासाठी ४ ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यामध्ये, पहिला पर्याय होता A) टाइपरायटर, B) दूरदर्शन, C) उपग्रह, D) २ हजार रुपयांची नोट.  अमिताभ यांच्या प्रश्नावर महिला स्पर्धक गुड्डी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने २ हजारची हे D ऑप्शनचे उत्तर दिले. मात्र, हे उत्तर चुकीचे ठरले. त्यावर अमिताभ बच्चन गुड्डी यांना म्हणतात की, तुमचे उत्तर चुकीचे आहे. त्यावेळी, गुड्डी यांनी वृत्तवाहिनीवर पाहिलेल्या व्हिडिओची आठवण सांगितली. त्यानंतर अमिताभ बच्चनही गडबडून गेले. मात्र, त्यांनी लगेचच त्या चुकीच्या बातमीने नुकसान तुमचे झाले, असे म्हणत गुड्डीला उत्तर दिले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.   

दरम्यान, वृत्त वाहिनीच्या व्हायरल व्हिडिओत चर्चा करताना, ही नोट जीपीएस सिस्टीमने जोडलेली असेल, त्यामुळे सॅटलाईटद्वारे त्याचा सिग्नल संबंधित यंत्रणांपर्यंत पोहचेल, असे महिला निवेदकांकडून सहकाऱ्यांना सांगण्यात येत होते. 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीDemonetisationनिश्चलनीकरण