शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:17 IST

Jodhpur Man Sets E-Rickshaw on Fire: जोधपूरमधील पंचवी रोडवर असलेल्या बजाज शोरूमबाहेर एका तरुणाने पाच लाख रुपयांची ई-रिक्षा पेटवून दिली.

जोधपूरमधील पंचवी रोडवर असलेल्या बजाज शोरूमबाहेर एका तरुणाने आपल्या मालकीच्या इलेक्ट्रिक रिक्षावर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सततचा बिघाड आणि शोरूमकडून मिळणाऱ्या खराब वागणुकीमुळे या तरूणाने ई- रिक्षा पेटवून दिल्याचे सांगण्यात आले.

मोहन सोलंकी नावाच्या तरुणाने सुमारे दीड वर्षांपूर्वी ५ लाख रुपये खर्चून इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी केली. ७० हजार रुपये डाउन पेमेंट आणि उर्वरित रक्कम कर्जावर घेऊन त्याने आपला व्यवसाय सुरू केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रिक्षाच्या बॅटरीमध्ये समस्या येत होती. कंपनीने १७० किमी मायलेजचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात रिक्षा केवळ ७४ किमी धावत होती.

नेमके प्रकरण काय? 

मोहनच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांत त्याने ८ पेक्षा जास्त वेळा सर्व्हिस सेंटरला भेट दिली. कंपनीने तपासणीसाठी हैदराबादवरून इंजिनिअरलाही बोलावले, पण मायलेजची समस्या दूर झाली नाही. वारंवार चकरा मारूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मोहनने १३ दिवसांपूर्वी आपली ई-रिक्षा चक्क गाढवाला बांधून सर्व्हिस सेंटरला नेली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, बुधवारी मोहनचा संयम सुटला. तो आपल्या पत्नी आणि भावासह शोरूमवर पोहोचला आणि रिक्षावर पेट्रोल ओतून पेटवून दिली. पत्नी रडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, तर त्याचा भाऊ या घटनेचे चित्रीकरण करत होता. आजूबाजुच्या लोकांनी तत्काळ पाणी ओतून आग अटोक्यात आणली.

रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे, शोरूमचे मालक हरीश भंडारी यांनी मोहनचे सर्व आरोप फेटाळून लावले. "तपासणीत रिक्षा पूर्णपणे ठीक असल्याचे आढळले. तरीही मोहन रिक्षा बदलून देण्यासाठी आमच्यावर विनाकारण दबाव आणत होता," असे त्यांनी म्हटले. याप्रकरणी शोरूम चालकांनी सरदारपुरा पोलीस ठाण्यात मोहनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Man sets e-rickshaw ablaze outside showroom due to faulty vehicle.

Web Summary : Frustrated with persistent e-rickshaw defects and poor service, a Jodhpur man torched his vehicle outside the Bajaj showroom. He had purchased the rickshaw for 5 lakh, but it delivered only 74km mileage against promised 170km. Police complaint filed against the rickshaw owner.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलRajasthanराजस्थानJodhpur courtजोधपूर न्यायालय