शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 20:25 IST

Israel Hamas War: All Eyes on Rafa सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, त्यामुळे भारतात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Israel Hamas War: सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी ट्रेंडिंगमध्ये येतात. सध्या  ‘All Eyes on Rafah’ ही ओळ ट्रेंडिंगमध्ये आली आहे. हजारो-लाखो नेटकरी 'All Eyes on Rafa’ लिहिलेल्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा सर्वात मोठा ट्रेंड बनला आहे. विशेष म्हणजे, या मुद्द्यावरुन दोन गट पडले असून, एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. आता प्रश्न पडतो की, हे  ‘All Eyes on Rafah’ नेमकं आहे तरी काय? 

काय आहे  ‘All Eyes on Rafah’? राफा हे गाझा पट्टीमधील एक शहर/ठिकाण आहे, जिथे नुकताच इस्रायली सैन्याचे (IDF) जोरदार हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात राफात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे जगभरातून पॅलेस्टाईनला पाठिंबा मिळत आहे. युरोपीय देशही इस्रायलचा उघडपणे विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळेच सध्या ‘All Eyes on Rafah’(सर्वांचे लक्ष राफावर आहे) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. राफाची लोकसंख्या सुमारे 14 लाख आहे. उत्तर गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानंतर अनेकांनी राफामध्ये आश्रय घेतला. आता इस्रायलने हा ठिकाणावरही हल्ला केला आहे.

भारतात 'राफा'ला पाठिंबाभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ‘All Eyes on Rafah’ अशी पोस्ट शेअर केली. पण, तिला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यामुळे तिने थोड्यावेळाने आपली पोस्ट काढून टाकली. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ‘All Eyes on Rafah’च्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

राफाह हल्ल्यावर इस्रायलने काय म्हटले?या हल्ल्यांबाबत इस्रायलचे म्हणणे आहे की, हमासचे दहशतवादी राफा शहरात लपून हल्ले करत आहेत, त्यामुळेच इस्रायलने स्वसंरक्षणार्थ राफामध्ये कारवाई केली. दरम्यान, इस्रायलने राफत केलेल्या हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल