शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 19:46 IST

काही दिवसापूर्वी टिकटॉक स्टार अयकुतने स्वत:शी लग्न केल्याचे समोर आले होते. आता तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी स्वत:शीच लग्न केल्या प्रकरणी एक टिकटॉक स्टार सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ती म्हणजे तुर्की टिकटॉक स्टार कुब्रा अयकुट. तिच्याबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्तंबूलच्या सुल्तानबेली येथील एका लक्झरी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून सोमवारी अयकुटचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून त्यामुळे ही आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. 

इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अयकुतच्या चाहत्यांनी त्यांच्या चिंता सोशल मीडियावर शेअर केल्या आणि अयकुट तिच्या मृत्यूपूर्वी त्रासदायक पोस्ट पोस्ट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नुकतेच तिने आपल्या वजनाबाबत एक पोस्टही केली होती. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये अयकुटने लिहिले होते की, मी माझी सर्व शक्ती वापरली आहे पण तरीही माझे वजन वाढत नाही. दररोज माझे एक किलो वजन कमी होत आहे आणि मला काय करावे हे समजत नाही.

अयकुतने टिकटॉकवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका व्हिडिओमध्ये तिने जाहीर केले की, मी माझ्यासाठी योग्य वर शोधू शकत नाही. यानंतर, अयकुत तिच्या कारमध्ये पुष्पगुच्छ घेऊन निघून जाताना दिसत आहे आणि स्वतःवर प्रेम करण्याचे वचन देत आहे. यानंतर, तिने त्याच दिवशीचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला, यामध्ये तिने बर्गर खाताना नर्व्हस वधू असल्याचे सांगितले.

तिच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावर शोककळा पसरली असून तिच्या फॅन्सना धक्का बसला आहे.