शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा जबरा फॅन! 'Sunlight Art ' च्या माध्यमातून रेखाटलं किंग कोहलीचं चित्र 'Video' पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:19 IST

भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे.

Social Viral : भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार खेळीने विराटने किक्रेटप्रेमींना आपलंस  केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडणार हा क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतो. सध्या विराट कोहली  इंडियन प्रीमिअर लीगमध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय.

दरम्यान, आयपीएल सामन्यांखेरीज विराट एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरलाय. सोशल मीडियावर त्याच्या एका फॅनने आपल्या अनोख्या कलाकारीने विराटविषयी प्रेम व्यक्त केलंय. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ विराटच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सोशल मीडिया हे कलागुणांना वाव देण्याचं एक लोकप्रिय असं माध्यम बनलं आहे. मनोरंजनसह अनेकांच्या कल्पकतेला न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. आयपीएलच्या या चालू हंगामात किंग कोहलीच्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सूर्यकिरणांच्या साहाय्याने या चाहत्याने क्रिकेटर विराट कोहलीचं सनलाईट आर्ट बनवलं आहे. गोल भिंगाचा वापर करत त्याने आपली क्रिएटिव्हिटी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. धगधगत्या उन्हात उभा राहून त्याने कोहलीचं हुबेहुब चित्र रेखाटलं आहे.

या व्हायरल व्हिडिओवर आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 'karthik_sunlight_artist' नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या  प्रमाणात कमेंट्सदेखील केल्याचं पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलVirat Kohliविराट कोहलीSocial Mediaसोशल मीडिया