Viral video : लंडन जगातील सगळ्यात श्रीमंत शहरांपैकी एक मानलं जातं. हे शहर आपली सुंदरता आणि ऐतिहासिक महत्वामुळं नेहमीच लोकांसाठी आकर्षण ठरतं. पण येथील जीवन फार महागडं आहे. एका भारतीय तरूणानं इन्स्टाग्रामवर लंडनमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर निराशा व्यक्त केली आहे. इथे तो एका चाळीसारख्या फ्लॅटसाठी महिन्याला १ लाख रूपये भाडे देतो.
आर्यन भट्टाचार्यनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलं की, 'चाळीत राहत असल्यासारखा अनुभव यूकेमध्ये घेतला. त्यानं त्याच्या फ्लॅटवर नाराजी व्यक्त केली. फ्लॅटच्या छतातून पाणी गळत असल्याचं दाखवत नाराजी व्यक्त केली. त्यानं सांगितलं की, रात्री प्लंबर न आल्यामुळे त्याला भांड्यांमध्ये पाणी गोळा करावं लागलं.
या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्याला स्थानिक काउन्सिलसोबत संपर्क करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी त्याला भारतात परतण्याचा सल्ला दिला.
एका यूजरनं लिहिलं की, "इथे राहणं इतकं महाग आहे हे माहीत असूनही तू स्वत: यूकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. जर तुला काही समस्या असेल तर आपली लाइफस्टाईल सुधार किंवा भारतात परत ये'.
दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, 'स्थानिक काउन्सिलला संपर्क करा आणि तक्रार करा. तुमचा घर मालक तुमच्याकडून तोपर्यंत भाडे घेऊ शकत नाही जोपर्यंत तुमची व्यवस्था होत नाही'.