चीनमधील एका मोठ्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडून विचित्र मागणी केली आहे. या मागणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 'आगीचा गोळा' खाण्यास भाग पाडले. एका विचित्र 'टीम-बिल्डिंग' कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना जळत्या कापसाच्या गाठी गिळून ती आग विझवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आता कंपनीला या कृतीसाठी सोशल मीडियावर लोकांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.
रोंगरोंग नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने ही घटना उघड केली. याबाबत त्यांनी पोस्ट केली आहे. ती आग भक्षण करण्याच्या कामात सहभागी होण्यास तयार नव्हती परंतु नोकरी गमावण्याच्या भीतीने तिला असे करण्यास भाग पाडण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ६० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. हे सर्व कर्मचारी सहा गटांमध्ये विभागले होते.
जिओक्सियांग मॉर्निंग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही कंपनी ईशान्य चीनच्या लिओनिंग प्रांतात स्थित एक शिक्षण संस्था आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, यामुळे त्यांना भीतीवर मात करण्यास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत होईल. कंपनीच्या नेतृत्वाला आमचा दृढनिश्चय दाखवणे हा यामागचा उद्देश होता. आम्हाला जिंकायचे आहे आणि पैसे कमवायचे आहेत हे दाखवण्यासाठी ते होते.
रोंगरोंग म्हणाले की, मला ते अपमानास्पद वाटले. या कार्यक्रमाने कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे आणि ती कंपनीविरुद्ध अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहे. कंपनीने अद्याप या आरोपावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
२०१६ मध्ये, पूर्व चीनमधील नानजिंग येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना धाडस निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याच्या डब्यांचे चुंबन घेण्यास आणि अनोळखी लोकांना मिठी मारण्यास भाग पाडले. एका वापरकर्त्याने खुलासा केला की त्याच्या कंपनीने त्याला डोळे बंद करून उंचावरून खाली पडण्यास सांगितले जेणेकरून सहकारी त्याला पकडू शकतील. यामध्ये अनेक मुली जखमी झाल्या होत्या.
चिनी कंपनीच्या या घटनेमुळे सोशल मीडियावर लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कंपनीच्या या धोकादायक पद्धतींचा अनेकांनी निषेध केला आहे.