शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

Ice Cream Prank Viral Video: आइसक्रीम वाल्याने चिमुरडीला रडवलं! रागाने लालबुंद झालेल्या मुलीने मग काय केलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:29 IST

आइसक्रीम प्रँकचे अनेक व्हिडीओ पाहून आपल्याला हसू येतो, पण या व्हिडीओ काही वेगळंच घडलं

Ice Cream Prank goes wrong Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्हीही सोशल मीडिया अकाउंटवर एक्टिव्ह असाल तर तुम्ही अनेक वेळा असे काही व्हिडिओ पाहिले असतील जे तुम्हाला खूप हसवतात. काही वेळा तर ठराविक व्हिडिओ इतके मजेदार वाटतात की, ते नवीन व्हिडिओ नसले तरीही पुन्हा-पुन्हा पाहावेसे वाटतात. हल्ली आइसक्रीम प्रँकचे व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात. त्यातील आइसक्रीम खरेदी करणाऱ्याची होणारी फजिती पाहून नक्कीच हसू आवरणं कठीण असते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आईस्क्रीम विक्रेत्याची कृती पाहून तुम्हाला काही वेळासाठी त्याचा नक्कीच राग येऊ शकतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मंगळवारी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८२ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या ३४ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये लग्नात पोहोचलेली मुलगी आईस्क्रीम खायला पुढे येते, पण तिच्यासोबत असे काही घडते ज्यामुळे मुलगी इतकी अस्वस्थ होते आणि रडू लागते. मुलीचा अक्षरश: तिळपापड होतो. ती आईस्क्रीम वाल्याकडे रागीट नजरेने बघू लागते. मुलगी चिडते कारण आईस्क्रीम विक्रेता त्या मुलीची वारंवार फजिती करत असतो. ती आईस्क्रीम घ्यायला जाते पण दरवेळ आइसक्रीम न मिळता नुसताच कप हाती येतो. त्यामुळे ती प्रचंड चिडते. अखेर तिच्यासोबतचा एक माणूस तिला उचलून घेतो आणि शांत करत आइसक्रीम मिळवून देतो. पाहा व्हिडीओ-

आइस्क्रीम प्रँक सध्या ट्रेंडमध्ये

सोशल मीडियावर आजकाल मुलांसोबत आईस्क्रीम प्रँक खूप ट्रेंडमध्ये आहे. आईस्क्रीमचा कोन मुलाच्या दिशेने केला जातो, परंतु प्रत्यक्षात मुलाला आईस्क्रीम अजिबात मिळत नाही. अशा प्रँक व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. बर्‍याच वेळा मुले आईस्क्रीम वाल्यावर इतके चिडतात की आईस्क्रीम वाल्याचा रिकामा कोन फेकून देतात. पण काही मुले इतकी गोंडस प्रतिक्रिया देतात की लोक ते व्हिडीओ वारंवार पाहत राहतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया