शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत नेत्याला विजयी करणं IAS अधिकाऱ्याला पडलं महागात, कोर्टाने दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:46 IST

मध्य प्रदेशातील एका आयएएस अधिकाऱ्याला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला मध्य प्रदेशउच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. पराभूत उमेदवाराला विजयी घोषित केल्याने अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायाधीशांनी पंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला विजयी केल्याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सुनावले आहे. संबंधित अधिकारी या पदावर राहण्यास लायक नसल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांनी म्हटले, "ते एका राजकीय एजंटप्रमाणे काम करत आहेत. जिल्हाधिकारी बनण्यास लायक नसून त्यांना या पदावरून हटवले पाहिजे." 

मागील महिन्यात गुन्नौर जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने विजयी उमेदवार घोषित केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांनी पन्ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिश्रा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच या अधिकाऱ्याला पदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नसल्याचे कोर्टाने सांगितले. २५ सदस्यीय गुन्नौर जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी २७ जुलै रोजी निवडणुक पार पडली होती. 

काय होते संपूर्ण प्रकरण? उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार परमानंद शर्मा यांनी २५ मधील १३ मते मिळवून भाजपाच्या पाठिंब्यावर रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी उमेदवार रामशिरोमणी मिश्रा यांचा पराभव केला. निवडणुकीच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी विजयी उमेदवाराला निवडणुकीचे प्रमाणपत्र दिले. मात्र त्याच दिवशी पराभूत उमेदवार रामशिरोमणी मिश्रा यांनी निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका पन्ना जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल केली होती.

विजयी उमेदवार परमानंद शर्मा यांनी आरोप करत म्हटले की, जिल्हाधिकारी संजय मिश्रा यांनी त्यांना सुनावणीची संधी न देता निवडणूक निकाल रद्द करण्याचा एकतर्फी आदेश पारित केला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी लॉटरी पद्धतीने नव्याने निवडणुका घेण्याचे आवाहन केले आणि नंतर पराभूत उमेदवार रामशिरोमणी मिश्रा यांना विजयी घोषित केले गेले. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMadhya Pradeshमध्य प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी