शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध व्यक्तीला रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहून मराठमोळा IAS अधिकारीही कारमधून उतरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:41 IST

एका आयएएस अधिकाऱ्याला रस्त्याच्या कडेला बसून वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना तुम्ही कधी पाहिलंय का? कदाचित याच लक्षवेधी कृतीनं मराठमोळ्या रमेश घोलप या IAS अधिकाऱ्यानं सर्वांचं मन जिंकलं आहे.

एका आयएएस अधिकाऱ्याला रस्त्याच्या कडेला बसून वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना तुम्ही कधी पाहिलंय का? कदाचित याच लक्षवेधी कृतीनं मराठमोळ्या रमेश घोलप या IAS अधिकाऱ्यानं सर्वांचं मन जिंकलं आहे. IAS अधिकारी रमेश घोलप यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर काही फोटो ट्विट केले आहेत. यात ते आपल्या इनोव्हा कारमधून खाली उतरुन थेट रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. तर घोलप यांचे सुरक्षा रक्षक मात्र कारमध्येच बसून आहेत. आयएएस अधिकाऱ्यानं ट्विट केलेले हे फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. 

एका वृद्ध व्यक्तीची विचारपूस करतानाचे फोटो रमेश घोलप यांनी ट्विट केले आहेत. ते ट्विट करताना घोलप यांनी "तज़ुर्बा है मेरा मिट्टी की पकड़ मजबूत होती है, संगमरमर पर तो हमने पांव फिसलते देखे हैं|", अशी शायरी ट्विट केली आहे. घोलप यांच्या ट्विटला अडीच हजारांहून अधिक लाइक्स आणि १७० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. अनेकांनी घोलप यांचं कौतुकही केलं आहे. 

रमेश घोलप मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसीलमधील महागांवचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं सायकलचं दुकान आहे. आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांनंतर २०१० साली यूपीएससीची परीक्षा त्यांनी दिली होती. पण त्यात अपयश हाती आलं होतं. पण २०११ साली त्यांनी पुन्हा एकदा त्याच जोशात तयारी केली आणि परीक्षा दिली. यावेळी संपूर्ण देशात २८७ रँकसह ते यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयएएस अधिकारी बनले. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगSolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरल