शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन...!" पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरूण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:56 IST

हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.

छिंदवाडा - लग्नासाठी मुलगी शोधण्याकरता एका तरुणाने अनोखी पद्धत शोधून काढली. तो एक पोस्टर घेऊन थेट रस्त्यावरच उभा राहिला. "लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन," असे या पोस्टरवर लिहिले आहे. हा व्हिडिओ छिंदवाडा येथील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, या पोस्टरच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. 

खरे तर आपल्या समाजात पालक लोक आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी नोकरी असलेल्या तरुणाला प्राधान्य देतात. पण या उलट छिंदवाड्यातील या तरुणाने चौकाचौकात उभे राहून सरकारी नोकरी असलेल्या मुलीचा शोध सुरू केला आहे. मला लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी. हुंडा मी देईन, असे त्यांनी या पोस्टरवर लिहिले आहे. त्याने याचा व्हिडिओही शूट केला आहे. जो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे. यावर यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट्सदेखील करत आहेत. 

फव्वारा चौकात तयार करण्यात आलाय हा व्हिडिओ -संबंधित तरुणाने तयार केलेला हा व्हिडिओ छिंदवाडा येथील फवारा चौकातील आहे. या व्हिडिओत विकल्प मालवी असे नाव लिहिलेलेही दिसत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, तरुणाने प्रसिद्धीसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तेथून ये-जा करणारे लोक पोस्टर वाचत आहेत. या तरुणाच्या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. छिंदवाडा मध्यप्रदेशात आहे. याच बरोबर हे शरह महाराष्ट्राच्या सीमेला लागूनही आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल