शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्वा, लय भारी! गरीबांच्या कुटुंबांचं पोट भरण्यासाठी 'या' पठ्ठ्यानं सुरू केलं धान्याचं ATM

By manali.bagul | Updated: September 30, 2020 18:27 IST

या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाची पगार कपात. अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब  होते. त्यामुळे दोनवेळचं जेवण मिळणंही खूप कठीण झालं होतं.

कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडून आला आहे. व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी जवळपास  दोन ते तीन महिने पूर्ण लॉकडाऊन होतं. या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाची पगार कपात. अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब  होते. त्यामुळे दोनवेळचं जेवण मिळणंही खूप कठीण झालं होतं. अशा स्थितीत विविध क्षेत्रातील लोकांनी  गोरगरीबांना मदतीचा हात दिला. आज आम्ही तुम्हाला  गोरगरीबांसाठी अन्नदाता ठरलेल्या माणसाबद्दल सांगणार आहोत.

रामू दोसपती हे हैदराबादचे रहिवासी आहेत.  कोरोनाकाळात गोरगरीबांची मदत करण्यासाठी त्यांनी ''राईस एटीएम'' सुरू केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत रामू हे गोरगरीब लोकांना खाण्या पिण्याच्या वस्तू, धान्य पुरवतात. वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार रामू दोसपती यांचे हे एटीएम २४ तास सुरू असते.  कोणलाही खाण्यासाठी काही हवं असल्यास डोसपती यांच्या घरी जाऊन रेशनचं सामान आणता येऊ शकतं. रामू गेल्या १७० दिवसांपासून गोरगरीबांना धान्य वाटत आहेत. नेहमीच त्यांच्या घरासमोर धान्य घेण्यासाठी लोकांची मोठी रांग लागलेली असते. आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च करून १५ हजार लोकांची मदत त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या कार्यासाठी त्यांना स्थानिकांनी खूप साथ दिली आहे. 

एका रिपोर्टनुसार रामू यांनी एकदा एका वॉचमनला भुकेलेल्या मजूरांची मदत करताना पाहिले. या वॉचमनने मजूरांसाठी २ हजार रुपये खर्च केले होते. त्यावेळी रामू यांना जाणवलं की, ६ हजार  रुपये कमावणारा एक वॉचमन गोरगरिबांसाठी इतकं करू शकतो आणि एक एचआर मॅनेजर  महिन्याला लाखो रुपये खर्च करून फक्त स्वतःच्या कुटूंबाबाबत विचार करतो. त्यानंतर  रामू यांनी लोकांची मदत करायला सुरूवात केली. रामू स्वतः एक एमबीए ग्रॅज्युएट असून सॉफ्टवेअर कंपनीत HR मॅनेजर आहेत. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरल