शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी तब्बल २ किलोमीटर धावला ट्रॅफिक पोलिस, पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 13:14 IST

Viral Video of traffic police in Marathi :सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मोठ्या शहरात तसंच उपनगरांमध्ये वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यामागे ट्रॅफिक पोलिसांची खूप मोठी भूमिका असते. साधारणपणे आपण अनेकदा पाहिलं असेल जास्त वाहतूक असल्यामुळे एखादी रूग्णवाहिका रस्त्यावर अडकली तर रूग्णाला मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. पण हैदराबादमधील या एक ट्रॅफिक पोलिसाने जे केले ते पाहून तुम्ही चकीत व्हाल. सोशल मीडियावर  एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हैदराबादमध्ये एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर या रुग्णावाहिकेला रस्ता देण्यासाठी वाहतूक पोलिसाने जवळपास २ किलोमीटरचा प्रवास धावत केला आहे. या पोलिसाचे नाव बाबजी असून शहरातल्या गर्दीच्या रस्त्यावर हा प्रसंग घडला. एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडिया युजर्ससह वरिष्ठ अधिकारी यांनीही या पोलिसाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. 

बाबजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनी एक रुग्णवाहिका पाहिली. या रुग्णवाहिकेत रुग्ण गंभीर स्थितीत होता. वाहतूक कोंडी झाल्यामुळे रूग्णाचे कुटूंबिय खूप चिंतेत होते. म्हणून काहीही करून रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा विचार या पोलिसानं केला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाला त्यांनी ट्रॅफिक सोडून त्यांच्या समोर चालण्यासाठी विनंती केली. यामुळे रुग्णवाहिकेला  रस्ता मोकळा मिळाला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जबरदस्त! भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो

या पोलिसाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्णवाहिलेला रस्ता देण्यासाठी पोलिस धावत आहे. आयपीएस अधिकारी अनिल कुमार यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके