शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मगरीने दाखवली माणुसकी; नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन केला, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:34 IST

मगरीने हल्ला केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हा व्हिडिओ खूप वेगळा आणि मनाला लागणारा आहे.

मगरींची गणना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. मगर तिच्या जबड्यात आलेल्या कुठल्याही प्राण्याची चिरफाड करू शकते. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये मगरी छुप्या पद्धतीने पाणी पिणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करते आणि पाण्‍यात घेऊन जाते. अशा परिस्थितीत मगरीसमोर माणसाचा निभाव लागणे अशक्य आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये मगर माणूसकी दाखवतीये.

व्हिडिओमध्ये एक मगर नदीत बुडून मेलेल्या लहान मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन पाण्याबाहेर येते आणि कुटुंबीयांच्या ताब्यात देते. त्या मुलाचे कुटुंबीयांना बऱ्याच वेळापासून मुलाचा शोध घेत होते, पण त्यांना मुलाचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर एका मगरीनेच त्यांची मदत केली आणि त्यांचा मुलाचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक विशालकाय मगर मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन कुटुंबीयांजवळ येत आहे. ती बोटीजवळ पोहोचते, तिथे उपस्थित लोक मुलाचे शरीर मगरीच्या पाठीवरुन उचलून घेतात. अशा प्रकारे मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन मगर तिथून निघून जाते. तुम्ही मगरींना माणसांवर हल्ला पाहिलं असेल, पण क्वचितच अशी औदार्य दाखवणारी मगरी तुम्ही पाहिली असेल.

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बुडलेल्या मुलाचा मृतदेह पाठीवर घेऊन एक महाकाय मगर. इंडोनेशियातील मगरीने भरलेल्या नदीतील व्हिडिओ.' अवघ्या 53 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय