Glue on lips viral video: आजकाल लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करतात. डान्स, गाण्याचे, डायलॉगबाजीचे अनेक व्हिडीओ तुम्ही नेहमीच पाहत असाल. पण काही लोक फेमस होण्यासाठी काहीही विचित्र करतात. एका मुलानं असंच काहीसं केलं, जे त्याला चांगलंच महागात पडलं. त्यानं गमती गमतीत आपल्या ओठांवर सुपरग्लू लावला. त्याला वाटलं फार काही होणार नाही, पण त्याला असं करणं महागात पडलं. जेव्हा त्याचं तोंड उघडणं बंद झालं, तेव्हा त्याला त्याची चूक समजली.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @badis_tv नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. व्हिडिओत एक व्यक्ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. हा मुलगा फिलिपीन्सचा राहणारा आहे आणि एका दुकानात बसून आपला व्हिडीओ बनवत आहे. व्हिडिओत बघू शकता की, एक मुलगा कॅमेरासमोर सुपरग्लू दाखवतो आणि नंतर गमती गमतीच आपल्या ओठांवर लावतो. ज्यामुळे त्याचे दोन्ही एकमेकांना चिकटतात. आधी तर तो हसतो, पण त्यांना लगेच त्याला त्याची चूक लक्षात येते.
गमतीत केलेला हा कारनामा धक्कादायक बनतो. जेव्हा तो तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला तोंड उघडता येत नाही. मग काय त्याचं हसू गायब झालं. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही त्याचं तोंड उघडत नाही. शेवटी वैतागून तो रडू लागतो.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ४७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तर ५५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो लाइक केला आहे. यूजर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकानं लिहिलं की, 'कुठून येतात असे लोक?'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'असं कसं करू शकतो हा?'.