कुत्रा आणि त्याच्या प्रामाणिक पणाबबात आपण अनेक गोष्टी ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? हे ड्रामा करण्यातही फार हुशार असतात बरं... असं आम्ही नाही तर टिकटॉकवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून दिसून येत आहे.
टिक टॉकवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी आपली कुत्र्याची नखं कापत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? अहो... या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचे एक्सप्रेशन पाहा. एवढी नाटकं कदाचितच कोणी करत असेल.
एका व्यक्तीने व्हिडीओला कॅप्शन देत असं लिहिलं आहे की, हा ड्रामा किंग आहे. तर आणखी एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'मला तर हसू आवरताच येत नाही'. तर व्हिडीओ पाहून आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'या कुत्र्याच्या अॅक्टिंगला माझा सलाम'
पाहा या ड्रामेबाजचे आणखी व्हिडीओ :