शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Photo: पाहावं ते नवलच! टॉयलेटमध्ये दिसला शार्कचा जबडा, फोटोवर धमाल कमेंट्सचा धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:57 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही

Viral Picture of Shark Open Mouth in Toilet: इंटरनेटचे जग खूप विचित्र आहे. इथे कधी बघायला मिळेल सांगता येत नाही. अनेकवेळा असे व्हिडिओ आणि फोटो समोर येतात, जे पाहून स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. नुकताच सोशल मीडियावर असाच एक फोटो लोकांना आश्चर्यचकित होण्यास भाग पाडत आहे. तो फोटो पाहून तुम्हीही एका मिनिटासाठी नक्कीच गोंधळून जाल. हा फोटो RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यामध्ये टॉयलेटमध्ये शार्कचे डोके लावले असून त्याचा जबडा उघडा असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेला हा मजेशीर 'शार्क टॉयलेट' फोटो पाहून यूजर्सही थक्क झाले आहेत. हे चित्र अतिशय अनोखे पण विचित्र आहे. चित्रात टॉयलेटमध्ये एक मोठा शार्क दिसत आहे. त्याने आपले भले मोठे तोंड उघडले आहे. पुरुषांसाठी वापरात असलेल्या या टॉयलेटमध्ये दिसणारा हा शार्क पाहून असे वाटते की खरोखरच एखाद्या धोकादायक शार्कने आपला जबडा उघडला असून तो आता कुणालाही गिळण्याच्या तयारीत आहे. तुम्हीच विचार करा, जर एखादी व्यक्ती अचानक टॉयलेटच्या आत आली आणि त्याने असे काही पाहिले तर त्यांना नक्कीच धक्का बसेल. पाहा फोटो-

हा मजेदार आणि अनोखा 'टॉयलेट शार्क' फोटो RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी @hvgoenka या ट्विटर हँडलवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत 144.9K व्ह्यूज मिळाले आहेत, तर १ हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कोणी असं का करेल?' त्यांच्या व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हा शार्क टँक फोबिया आहे. कदाचित हा अनुपमच्या ऑफिसचा फोटो असेल.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'एखादा व्यक्ती असे काही तरी पाहून मग उघड्यावरच जाणे पसंत करेल.' आणखीही काही भन्नाट कमेंट्स करण्यात आल्या आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया