शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Haircut Salon Accident Viral Video: सलूनमध्ये बसला होता तरूण, अचानक आत घुसली कार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:22 IST

कार थेट आत आल्यानंतर साऱ्यांचीच पळापळ झाली अन् त्यावेळीच...

Haircut Salon Accident Viral Video: अनेकदा रस्ते अपघात टाळण्यासाठी लोक खबरदारी घेतात. पण अचानक होणाऱ्या अपघातांबद्दल कोणालाच आगाऊ माहिती नसते, त्यामुळे लोक स्वतःला सावध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळा तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण अपघात हा अतिशय विचित्र प्रकारे घडतो. वीट-दगडाच्या आणि सिमेंटच्या भिंतीच्या पलीकडे बसलेली व्यक्तीला ही एखाद्या कारने उडवलं असं म्हटले तर तुम्हाला पटेल का... पण खरंच असं घडलं आहे. हे ऐकायला खूप विचित्र वाटत असले तरी घडले आहे.

या संदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सलूनमध्ये केस कापणे आणि आपल्या केस कापण्याचा नंबर येण्याची वाट पाहणे एका व्यक्तीला भलतेच महागात पडले. अशी अतिशय सामान्य प्रक्रिया सुरू असतानाच तेवढ्यात एका मोठ्या कारने भिंत आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला. ही गोष्ट ऐकताना नक्कीच अशक्य वाटते. पण असं खरंच घडलं. पाहा व्हिडीओ-

संपूर्ण घटना अशी घडली की, पाच-सहा पुरुष एका सलूनमध्ये होते. त्यावेळी दोन लोक दोन लोकांचे केस कापण्यात व्यग्र होते. एक माणूस बेंचवर बसलेला होता. त्याच वेळी अचानक साऱ्या जणानी एंट्री गेटकडे पाहिले आणि काहीसे घाबरले. त्या लोकांना काही भीतीदायक गोष्ट दिसली अशा प्रकारे त्यांनी एंट्री गेटच्या दिशेने नजर मारली जणू काही त्यांनी काही तरी भयावह गोष्ट ऐकली आणि त्यांना धक्का बसला. तितक्यात बेंचवरचा माणूस दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. दोन ग्राहक पटकन त्या बाकावरून उठले पण एकाला काही कळायच्या आतच एक भरधाव कार थेट सलूनमध्ये घुसली आणि तो माणूस संकटातून बाहेर पडण्याआधीच त्याच्या दिशेने कार भरधाव वेगाने सलूनमध्ये धडकली. बेंचवर बसलेल्या माणसाला गाडीची जोरदार धडक बसली. पुढे त्याचे काय घडले हे कळले नसले तरी ती धडक पाहता त्या व्यक्तीला दुखापत झाली असणार असे म्हणण्यात येत आहे. सलूनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  कैद झाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया