ग्रेटर नोएडा येथील एका हाय-प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबासाठी कालची रात्र काळरात्र ठरली असती. १ कोटींहून अधिक किंमत मोजून घेतलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीचे छत भररात्री अचानक कोसळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून बांधकाम दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. जेव्हा फ्लॅटमधील रहिवाशांनी बाल्कनीचा दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. बाल्कनीच्या छताचा मोठा भाग कोसळून तिथे सिमेंट आणि काँक्रीटचा ढिगारा पडला होता. सुदैवाने, ज्या वेळी हे छत कोसळले, त्या वेळी बाल्कनीमध्ये कोणीही नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
रहिवाशांचा संतापफ्लॅट मालकाने या घटनेचा व्हिडिओ शूट करताना प्रशासनावर आणि बिल्डरवर तिखट शब्दांत ताशेरे ओढले. "आम्ही या फ्लॅटसाठी २८,००० रुपये मेंटेनन्स देतो आणि १ कोटींहून अधिक रक्कम देऊन घर विकत घेतले आहे, तरीही आम्हाला अशा धोक्याचा सामना करावा लागत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मुंबई, पुणे, बंगळुरूनंतर नोएडा ही देशाचा मोठा हॉटस्पॉट बनला आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच ग्रेटर नोएडा आणि नोएडा परिसरातील सोसायट्यांमध्ये बांधकामाचा दर्जा खालावल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या घटनेमुळे आता रहिवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Web Summary : A balcony roof collapsed in a Greater Noida high-profile society flat, raising concerns about construction quality. Residents express anger over high maintenance fees and safety risks after paying over a crore for the flat. The incident highlights the issue of declining construction standards in Noida.
Web Summary : ग्रेटर नोएडा की एक हाई-प्रोफाइल सोसाइटी में एक फ्लैट की बालकनी की छत गिर गई, जिससे निर्माण गुणवत्ता पर चिंता जताई जा रही है। निवासियों ने फ्लैट के लिए एक करोड़ से अधिक का भुगतान करने के बाद उच्च रखरखाव शुल्क और सुरक्षा जोखिमों पर गुस्सा व्यक्त किया। घटना नोएडा में निर्माण मानकों में गिरावट के मुद्दे को उजागर करती है।