शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

Gold Price Old Bill: आजोबांची तिजोरी बऱ्याच दिवसांनी उघडली! सोन्याच्या दागिने खरेदीचे जुने बिल सापडले, नातू हमसून हमसून रडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 15:41 IST

अष्टेकर सोनार... काय दिवस होते... आता १० रुपयांत काय येते???

सध्या महागाईने सामान्य होरपळून गेला आहे. हौस, मौज सोडा घरात कडधान्ये, भाज्या आणण्यातच आमदनी संपू लागली आहे. मग अशावेळी ६० हजारांकडे कूच करणारे सोने कुठून खरेदी करायचे, आहे तेच विकायची वेळ आली असताना सोने खरेदीचे एक जुने बिल व्हायरल होत आहे. ५०- ६० वर्षांपूर्वी ज्या किंमतीत फियाट कार यायची त्या किंमतीत आता स्कूटरची दोन चाकेही येत नाहीएत. तेव्हा पेट्रोल ७२ पैसे होते, आता ते १०६ रुपयांवर गेले आहे. ही आहे महागाई. ही महागाई वाढल्यापासून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जुनी बिले व्हायरल होऊ लागली आहेत. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात हिशेबाची गणिते तरळू लागली आहेत. असेच आज एक सोने खरेदीचे बिल आले आहे. हे बिल १९५९सालचे आहे. महत्वाचे म्हणजे त्या काळात खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होत होती. तेव्हा सोने १० रुपये प्रति ग्रॅम होते. आज दहा रुपयांत काय येते म्हणाल तर... तुम्हीच हिशेब घाला. हे बिल महाराष्ट्रातील एका ज्वेलरीशॉपचे आहे. ६५ वर्षांपूर्वी सोन्याची किंमत ११० रुपये प्रति तोळा होती. म्हणजेच तेव्हा सोने १०-११ रुपये प्रति ग्रॅम मिळायचे. आता त्याची किंमत ५६०० रुपये एवढी प्रचंड आहे. तेव्हा सोने खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम होते आमि सोनार मेसर्स वामन निंबाजी अष्टेकर होते. त्यांनी एकूण १०९ रुपयांची सोने, चांदीच्या दागिण्यांची खरेदी केली होती.सोशल मीडियावर हे बिल व्हायरल होत आहे. चांगले दिवस तेच होते असे युजर्सचे म्हणणे आहे. तर काही युजर्स तेव्हाचे १०० रुपये म्हणजे आताचे ५०००० रुपये असेच होते. तेव्हा लोकांना ५ रुपये पगार होता. पैशांत व्यवहार चालायचे असे म्हणत आहेत. पण काहीही असो १० रुपयांना प्रतिग्रॅम पाहून आताच्या तुमच्या खिशातील पैशांच्या हिशेबाचे गणित डोळ्यांसमोरून नक्कीच गेले असेल. 

टॅग्स :Goldसोनं