शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डसाठी तयार केले २२ नियम, यादी पाहून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:15 IST

सोशल मीडियात सध्या एका गर्लफ्रेन्डची बॉयफ्रेन्डसाठी तयार केलेली नियमांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीत एका मुलीने एक-दोन नाही तर चक्क २२ नियम तयार केले आहेत.

सोशल मीडियात सध्या एका गर्लफ्रेन्डची बॉयफ्रेन्डसाठी तयार केलेली नियमांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीत एका मुलीने एक-दोन नाही तर चक्क २२ नियम तयार केले आहेत. गमतीदार बाब म्हणजे ही यादी एका कारमध्ये होती आणि ही कार नुकतीच विकण्यात आली. ज्यांनी ही कार विकत घेतली त्यांनी ही यादी सोशम मीडियात शेअर केली आहे. 

डेटिंगच्या नियमांची यादी पाहून अनेकजण चक्रावून गेले आहेत. पण अजूनही ही यादी तयार करणाऱ्या मुलीची आणि या नियमांचं पालन करणाऱ्या बॉयफ्रेन्डचा पत्ता लागला नाहीये. एकमात्र नक्की की, ही यादी पाहून प्रेमाच्या नात्यात असलेला अविश्वास आणि असुरक्षितता व्यक्तीला काय करायला भाग पाडते. 

सोशल मीडिया यूजर्समध्ये यावरुन चर्चा रंगली असून ते आपापली मते मांडत आहेत. काहींना वाटत आहे की, मुलगा कदाचित मुलीला दगा देत असावा. त्यामुळेच मुलीने इतके कठोर नियम तयार केले. हा यादी ट्विटरवर शेअऱ करणाऱ्या व्यक्तीने ट्विट डिलीट केलं आहे. पण ही यादी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. 

काही सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत की, अशाप्रकारे नियम तयार करणे प्रेमाची बाब नाहीये. हे कुणाचंतरी लाईफ कंट्रोल करण्यासारखं आहे. एकाने लिहिले आहे की, या मुलाने आताच्या आता त्या मुलीपासून दूर जावं. ही यादी पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

काय आहेत नियम?

१) तुझ्याकडे कोणत्याही सिंगल तरुणीचा मोबाईल नंबर असू नये.

२) कोणत्याही मुलीला सोशल मीडिया(इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि ट्विटर) फॉलो करणार नाही.

३) तू किगन( मित्राचं नाव) सोबत वेळ घालवणार नाही. (त्याच्या घरी किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणीही त्याला भेटायचं नाही)

४) तू माझ्याशिवाय कधीही होंडा जाणार नाही.

५) आठवड्यातील दोन दिवसांपेक्षा जास्तवेळा तू मित्रांसोबत बाहेर जायचं नाही. 

६) तू कोणत्याही सिंगल तरुणीकडे बघायचं नाहीस.

७) जर एखादी मुलगी कोणत्याही वेळी किंवा कोणत्या जागी तुझ्याजवळ येत असेल तर तू तिच्यापासून दूर जायचंस.

८) मो(मित्राचं नाव) प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत असू नये. 

९) तू मला ***** साठी कधीही बोलणार नाही. 

१०) तू माझ्यावर कधीही कोणत्याही गोष्टीवर रागवायचं नाही. 

११) तू टायलर, नोआह, देवेन आणि जॉशला कधीही घेऊन येणार नाही. 

१२) तू मी नसताना कधीही ड्रिंक करणार नाहीस.

१३) माझं जेव्हा मन होईल तेव्हा मी तुझा फोन चेक करणार.

१४) मी तुझ्यासोबत असेल तर तिथे दुसरी कोणतीही मुलगी येऊ नये.

१५) जर आपण सोबत असलो तर तुझे मित्र कधी कधीच तुझ्या घरी येतील.

१६) जर मी तुला एखाद्या मुलीसोबत पाहिलं तर मी तुझा खून करणार.

१७) तू तुझ्या मित्रांसाठी मला कधीच सोडणार नाही.

१८) जर मी तुझ्यासोबत हॅंगआऊट करत असेल तर ऑस्टिन हे कंट्रोल करणार नाही. 

१९) आपण आठवड्यातून कमीत कमी एकदा डेटवर जाऊ.

२०) जर मी म्हणाले की, उडी मार! तर तू म्हणायचे, 'जी राजकुमारी'.

21) तुला दिवसातून कमीत कमी एकदा म्हणावे लागेल की, तू माझ्यावर प्रेम करतो. जेणेकरुन मला हे कळेल की, तुझं दुसरीकडे काही सुरु नाही.

२२) माझ्या मेसेजचं उत्तर द्यायला तुला १० मिनिटांपेक्षा जास्त उशीर होऊ नये.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्