Viral Video : लग्नांमध्ये मजा-मस्तीची काहीच कमतरता नसते. मित्र-मैत्रिणी आणि परिवारातील लोक आनंदाचं वातावरण तयार करतात. नवरी-नवरदेव सुद्धा लग्नात एन्जॉय करतात. लग्नाच्या या धामधुमीत अनेक मजेदार किस्सेही घडतात. कधी नवरदेव स्टेजवर पडतो, तर कधी घोडी नवरदेवाला घेऊन पळून जाते. इतकंच नाही तर कधी कधी घोडी नवरदेवाला पाठीवर बसूनही देत नाही. मात्र, सध्या एका लग्नातील नवरदेवाचा एक वेगळाच मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोकं लोटपोट होऊन हसत आहेत. व्हिडिओत एक तरूणी नवरदेव बसला असलेल्या घोडीवर चढून डान्स करताना दिसत आहे. पण डान्स करता करता अचानक असं काही होतं की, बघून हसू आवरता येत नाही. हा क्षण नवरदेवासाठी नेहमीसाठी यादगार बनला आहे.
व्हिडिओत बघू शकता की, नवरदेव आरामात घोडीवर बसला होता आणि वरातीचा आनंद घेत होता. तेव्हा एक तरूणी घोडीवर चढून डान्स करताना दिसत आहे. आधी तर सगळं काही व्यवस्थित असतं. पण काही वेळानंतर तरूणीचा बॅलन्स बिघडतो आणि थेट नवरदेवावर जाऊन पडते. इतकंच नाही तर त्यानंतर दोघेही खाली जमिनीवर पडतात. नंतर काही लोक त्यांना सावरतात. पण हा नजारा बघून सगळेच हसायला लागले होते.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ‘mrs_rao_official_1111’ नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. एकानं गंमतीनं लिहिलं की, "आता दोघांचीही कंबर दुखत असेल". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "करा आणखी मस्ती".
लग्नांमध्ये अशा छोट्या-मोठ्या मजेदार गोष्टी नेहमीच घडत असतात. ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. कधीतरी या गोष्टी आठवल्या की, हळूच चेहऱ्यावर हसू फुलतं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.