शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

सिंहीणीच्या जबड्यातून बाहेर काढलं पिल्लाला, पण शेवट त्या पिल्लाचा 'अशाप्रकारे' झाला अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 18:02 IST

आई आणि पिल्लू आरामात फिरत असतानाच एका बाजूने हायनांचा कळप तर दुसऱ्या बाजूने एक सिंहिण येते. या सर्वांची नजर जिराफाच्या पिल्लावरच असते. मात्र काहीच वेळात हायनांच्या कळपाचा निर्णय बदलला.

जंगल सवारीची मजा घेणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र यावेळी जंगली प्राण्यांचं भयानक रूप आणि लढाई सर्वांनाच पाहायला मिळेल, असं नाही. सध्या जंगलातील एक अतिशय खास व्हिडिओ समोर आला आहे (Lioness Attack Baby Giraffe Video). यात एक मादी जिराफ आपल्या पिल्लासोबत (Baby Giraffe video) चालताना दिसत आहे. कदाचित ती आपल्या पिल्लाला आपल्या संरक्षणात जंगलाची ओळख करून देत असावी. आई आणि पिल्लू आरामात फिरत असतानाच एका बाजूने हायनांचा कळप तर दुसऱ्या बाजूने एक सिंहिण येते. या सर्वांची नजर जिराफाच्या पिल्लावरच असते. मात्र काहीच वेळात हायनांच्या कळपाचा निर्णय बदलला.

सिंहिण मात्र पिल्लाच्या शिकारीच्याच बेतात होती. हे पिल्लू अजून व्यवस्थित धावायलाही शिकलेलं नव्हतं. अशात त्याला सिंहिणीची शिकार बनण्यापासून वाचवणं त्याच्या आईची जबाबदारी होती. बराच वेळ जिराफ आपल्या पिल्लासोबत सावली बनून उभा राहिलं. मात्र पुढच्याच क्षणी सिंहिणीने या पिल्लावर हल्ला केला (Lioness Attack Baby Giraffe Video) . सिंहिणीने या पिल्लाला आपल्या जबड्याच पकडलं आणि लांबपर्यंत ओढत घेऊन गेली.

सिंहिणीपुढे या पिल्लाचं नेमकं काय झालं असेल? कदाचित तुम्हालाही असं वाटेल की पिल्लाचा शेवट झाला असेल. मात्र, लाख प्रयत्न करूनही सिंहिण या पिल्लाची शिकार करू शकली नाही आणि एखाद्या चमत्काराप्रमाणे बेबी जिराफ उठून उभा राहिलं आणि तिथून दूर गेलं. मात्र भरपूर जखमी झाल्याने आणि अशक्त असल्याने हे पिल्लू नदीत जाऊन कोसळलं. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच ते नदीच्या पाण्यात वाहून गेलं. जिराफाच्या पिल्लाचा ज्या पद्धतीने अंत झाला, ते पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

आयुष्यासाठीच्या संघर्षाचा हा व्हिडिओ वाईल्डलाईफवर काम करणाऱ्या कुगर कंपनीच्या www.latestsightings.com चॅनेलचा आहे. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला, वाईल्डलाईफ फोटोग्राफर (Wildlife photographer)आणि Escape Safari चे मालक डॉन हेनके आणि सफारी कन्सलटंट रुस्तम फ्रेमजी (Rustom Framjee) यांनी.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया