बऱ्याचदा आपण सुट्टीसाठी आपल्या मॅनेजरला अनेक ईमेल लिहिले असतील. कधी आजारपणामुळे तर कधी तातडीने कुठे बाहेर जायचे असल्यास सुट्टी मागितली असेल. काही वेळा कारण इतके पर्सनल असते की सुट्टी घेताना दुसरं एखादे कारण सांगावे लागते. पण अलीकडेच Gen Z कर्मचाऱ्याचा सुट्टीसाठी लिहिलेला ईमेल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. या ईमेलमध्ये त्याने सुट्टीसाठी सांगितलेले कारण आश्चर्यकारक आहे.
सोशल मीडियावर हा ईमेल त्याच्या मॅनेजरनेच शेअर केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर Gen Z तरुणाईचा बेधडकपणा आणि मजेशीर स्वभावावर चर्चा सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्याने सर, माझे ब्रेकअप झालंय असं सांगून १० दिवसांची सुट्टी मागितली आहे. Gen Z म्हणजे नवीन पिढी, जी थेट आणि स्पष्ट विचारांसाठी ओळखली जाते. मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीचा ठरू शकतो, पण काही वेळा त्यांच्या फायद्याचाही ठरतो. बऱ्याच ऑफिसमध्ये सध्या Gen Z कर्मचारी खुलेपणाने बोलणे, त्यांची मते मांडणे यासाठी चर्चेत असते. याआधीही सोशल मीडियावर Gen Z कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर चर्चा झाली आहे. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ब्रेकअप झाल्याने १० दिवसांची सुट्टी मागितली. ती लगेच मंजूरही करण्यात आली आहे.
या ईमेलमध्ये काय लिहिलंय?
KnotDating चे को-फाऊंडर आणि सीईओ जसवीर सिंह यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिलंय की, मला सर्वात प्रामाणिकपणे लिहिलेला एक ईमेल मिळाला. त्यात लिहिले होते, हॅलो सर, अलीकडेच माझा ब्रेकअप झाला आहे आणि त्यामुळे मला माझ्या कामावर फोकस करता येत नाही. मला थोड्या विश्रांतीची गरज आहे. मी आज घरूनच काम करतो. मला २८ ते ८ तारखेपर्यंत सुट्टी हवी आहे असं त्याने ईमेलमध्ये म्हटलंय. या ईमेलचा स्क्रिनशॉट्स पोस्ट करण्यात आला आहे. जनरेशन झेड कोणतेही फिल्टर वापरत नाही असं जसवीरने म्हटलं आहे. ही पोस्ट बरीच व्हायरल झाली आणि ३.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, या व्हायरल पोस्टवरून सोशल मीडियातही चर्चा सुरू झाली. एका युजरने हे अत्यंत बरोबर आहे, त्यापेक्षा चांगले कारण सांगण्याची गरज भासली नसती असं सांगितले. तर दुसऱ्या युजरने भाई, लग्नासाठीही लोक इतकी मोठी सुट्टी घेत नाही असं म्हटलं. तिसऱ्याने मीदेखील ही सुट्टी लगेच मंजूर केली असती, कारण त्याने प्रामाणिकपणे कारण सांगितले. तो त्याच्या स्थितीमुळे योग्य काम करू शकणार नाही असं मत मांडले आहे.
Web Summary : A Gen Z employee's honest email to their boss about a breakup resulted in a 10-day leave approval. The manager shared the email, sparking discussions about Gen Z's straightforwardness in the workplace and their approach to personal matters.
Web Summary : एक Gen Z कर्मचारी ने ब्रेकअप के बारे में बॉस को ईमानदारी से ईमेल भेजा, जिसके परिणामस्वरूप 10 दिन की छुट्टी मिल गई। मैनेजर ने ईमेल साझा किया, जिससे कार्यस्थल में Gen Z की स्पष्टवादिता पर चर्चा हुई।