शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने नूडल्स मागवले, शेवटच्या घासावेळी जिवंत बेडूक आढळले; पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:23 IST

Frog Found In Noodles: सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Frog Found In Noodles: हॉटेलमध्ये जेवताना जेवणात किडे, पाल, कॉकरोच आढळल्याच्या घटना तुम्ही अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. यासंबंधी व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओपेक्षा खूप वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये अन्नात चक्क जिवंत बेडूक आढळले आहे. 

Kaito (@kaito09061) नावाच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये नूडल्स ऑर्डर केले होते, पण त्याच्या नूडल्समध्ये चक्क जिवंत बेडूक आढळले. जपानमध्ये घडलेल्या या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. नूडल्समध्ये बेडूक पाहून तो माणूस खूप घाबरला, कारण त्याने त्याच्या कपमधील बरेच नूडल्स खाऊन घेतले होते.

शेवटचा घास खाताना बेडूक दिसला

नूडल्सच्या आत बेडूक आढळताच त्या व्यक्तीने फोनमध्ये घटना रेकॉर्ड केली. त्या व्यकीने कपमधील सर्व नूडल्स खाऊन घेतले होते आणि शेवटच्या घासावेळी त्याला बेडूक दिसला. या घटनेनंतर रेस्टॉरंटने दुसऱ्या दिवशी आपल्या वेबसाइटद्वारे माफी मागितली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कारखान्यातून कच्चा माल येतो, त्यावेळेस हे बेडूक आले असावे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJapanजपानJara hatkeजरा हटके