शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय रागाने थुंकले; व्हिडीओ व्हायरल होताच झाले ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:32 IST

लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय थुंकल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात तर काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये मंत्री महोदय थुंकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंत्री साहेब रागामध्ये चालू डिबेटमध्ये थुंकतात ज्याची नेटकरी खूप खिल्ली उडवत आहेत. लाईव्ह डिबेटमध्ये अनेकवेळा राजकारणी लोकांचा राग अनावर झाल्याचा पाहायला मिळतो. यापूर्वी देखील लाईव्ह डिबेटमध्ये मारहाण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाकिस्तानमधील माजी मंत्री शेख रशीद अहमद यांचा आहे. व्हिडीओमध्ये रशीद अहमद लाईव्ह डिबेटमध्ये थुंकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पत्रकार नाइला इनायत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. नेटकरी आता शेख रशीद यांच्या या कृत्याची खूप खिल्ली उडवत आहेत. हे नक्की डिबेट चालू आहे की कट्ट्यावरची भांडणं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेटकऱ्यांनी साधला निशाणाशेख रशीद पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्याबद्दल भाष्य करत होते, तेवढ्यात त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. गृहमंत्र्यावर टीका करताना ते एवढे संतापले होते की ते रागात चक्क थुंकले. दरम्यान, त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे ते सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. एका माजी मंत्र्याला बोलण्याचे भान कसे नाही याबाबत विचारणा केली जात आहे. व्हिडीओ शेअर करताना पत्रकाराने देखील नकळत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानministerमंत्रीHome Ministryगृह मंत्रालय