शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डान्सिंग अंकल नंतर डान्सिंग डॅड, तेही विदेशी....भोजपुरी गाण्यावर केला धम्माल डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 13:41 IST

म्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? बॉलीवुडची गाणी तर आवडतच असतील पण तुम्ही कधी भोजपूरी गाण्यांवर डान्स केला आहे का? नसेल केला तर करून बघा आणि तुम्हाला स्टेप्सच शिकायच्या असतील तर वॉशिंग्टन मधल्या रिकी पॉंड यांना फॉलो करा.

बॉलीवुडमधल्या गाण्यांवर थिरकणाऱ्या ललनांनाही मागे टाकणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? बॉलीवुडची गाणी तर आवडतच असतील पण तुम्ही कधी भोजपूरी गाण्यांवर डान्स केला आहे का? नसेल केला तर करून बघा आणि तुम्हाला स्टेप्सच शिकायच्या असतील तर वॉशिंग्टन मधल्या रिकी पॉंड यांना फॉलो करा. त्यांचा भोजपुरी डान्स बघुन तुम्हाला हसू तर आवरणार नाहीच पण तुम्हालाही त्यांच्यासोबत डान्स करायला मजा येईल. एक परदेशी व्यक्ती भोजपूरी गाण्यावर डान्स करते हे पाहुन तुम्ही पोटदुखेपर्यंत हसाल.

वॉशिंगटन मध्ये राहणारे रिकी पाँड हे आपल्या मुलांसोबत बॉलीवुडच्या गाण्यावर डान्स करतच असतात. त्यांचे अनेक बॉलीवुड गाण्याचे व्हिडिओ इंटरनेटवर हिट झाले आहेत. त्यामुळे त्यांचा भोजपुरी गाण्याच्या व्हिडिओलाही नेटीझन्सकडून वाहवा मिळतेय. त्यांनी या व्हिडिओत 'लॉलीपॉप लागेलु' या भोजपूरी गाण्यावर ठेका धरला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स टिपिकल भोजपूरी स्टाईलमध्ये आहे. हा डान्स बघताना तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. त्यांच्या या व्हिडिओत त्यांची मुलगीपण मागून डान्स करते आहे. त्यांच्या आधीच्या गाण्यावर प्रिती झिंटानेही कमेंट केली आहे. इन्स्टाग्रामवर डान्सिंग डॅड विथ फोर किड्स ही टॅगलाईन ठेऊन ते आपले व्हिडिओज अपलोड करतात. बीबीसीला मुलाखत देताना ते म्हणाले की मी पेशाने ग्राफिक डिझायनर आहे. मला डान्स करायला खुप आवडतो. माझ्या मुलांनी मला डान्स शिकवला. मी रोज १० तास काम करतो आणि उरलेल्या वेळात डान्स व्हिडिओ तयार करतो. त्यांनी असंही सांगितलं की, मला बॉलीवुडपासून ते भोजपुरी पर्यंत सर्व गाण्यांच्या डान्स स्टेप्स खुप आवडतात. युजर्सनी तर त्यांच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर त्यांना बॉलीवुडमध्ये येण्यासही सांगितले आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल