शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

FlashBack2019 : २०१९ मध्ये खाण्या-पिण्याचे हे पदार्थ पाहून सिंघमची सटकली अन् हीरा ठाकूरने केली उलटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 12:41 IST

२०१९ मध्ये सोशल मीडियात हजारो गोष्टी गाजल्या आणि त्यावर चर्चा झाली. पण यातील काही खास गोष्टी लोक आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत.

२०१९ मध्ये सोशल मीडियात हजारो गोष्टी गाजल्या आणि त्यावर चर्चा झाली. पण यातील काही खास गोष्टी लोक आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल अशा कोणत्या गोष्टी आहेत. तर या आहेत काही विचित्र पदार्थांच्या डिश...२०१९ मध्ये विचित्र पदार्थांचा एक विचित्र ट्रेन्ड बघायला मिळाला. हे पदार्थ इतके विचित्र होते की, तुमची तर सटकेलच सोबतच सिंघमची पण सटकेल.

सप्टेंबरध्ये एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात व्हिडीओत महिला चक्क दुधात मॅगी तयार करण्याची रेसिपी सांगत होती. यात तिने गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या होत्या. ही रेसिपी पाहून लोकांना सूर्यंवंशममधील हीरा ठाकूरच्या उलटीची आठवण झाली.मग काय दूध-मॅगीनंतर एकापेक्षा एक टुकार रेसिपी समोर येऊ लागल्या. त्यानंतर समोर संत्रा मॅगी चर्चेत आली होती.

अनेक भाज्या तुम्ही खाल्ल्या किंवा पाहिल्या असतील. पण कधी गुलाबजामची भाजी खाल्ली का? नक्कीच खाल्ली नसेल. पण अशाही एका भाजीचा फोटो एकाने सोशल मीडियात शेअर केला होता. 

त्याहून पलिकडे जाऊन एका वडापावसारखा गुलाबजाम पाव सुद्धा खाल्ला. नुसता खाल्ला नाही तर त्याचा फोटोही शेअर केला. हे पाहून वडापाव प्रेमींची चांगलीच सटकली होती.

आता मला सांगा काजू कतली जर अशी टोमॅटो सॉससोबत खाल्ली तर बच्चे जान नही जायेगी तो क्या होगा भाई...

डोसा किती चांगला पदार्थ आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण चॉकलेट डोसा खावा लागला तर कसं व्हायचं?

कुरकुरे आणि दूध...असं कुठं असतं का राव?

सकाळच्या नाश्त्यात इडली आणि सांबर खाणं पसंत करतात. पण हा महान व्हिडीओ पाहिल्यावर इडली आणि चहा दोन्हींवरून तुमचं मन उठेल.

टॅग्स :flashback 2019फ्लॅशबॅकNew Yearनववर्ष31st December party31 डिसेंबर पार्टीSocial Viralसोशल व्हायरल