शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सिंहाच्या तावडीतून वाचली अन् मगरीच्या जबड्यात अडकली, पाहा म्हशीच्या शिकारीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:42 IST

इंस्टाग्रामवर अपलोड झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 22 हजाराहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत.

हॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांनी 'फायनल डेस्टिनेशन' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. जर तुमच्यावर मरणाची वेळ आली तर तुम्ही मृत्यूपासून वाचू शकत नाही, हे त्यात दाखवण्यात आले आहे. असेच काहीसे या म्हशीच्या बाबतीत घडले, परंतु म्हशीला जगण्याची इच्छा होती, त्यामुळे अनेक हल्ले होऊनही ती वाचली. म्हशीवर आधी सिंहाने हल्ला केला, मात्र तिने पळून जाण्यासाठी पाण्यात उडी मारली असता एका महाकाय मगरीने तेथे तिच्यावर हल्ला केला. अनेकवेळा हल्ला करूनही म्हैस कशीतरी पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सिंहाच्या तावडीतून अशी वाचली

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक म्हैस सिंहाच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ 'नेचर27_12' या युजरने इंस्टाग्रामवर अपलोड केला असून तो सुमारे 22 हजार वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक म्हैस आपला जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहे. सिंह तिचा पाठलाग करताना यात दिसत आहे. सिंहापासून वाचण्यासाठी म्हैस पाण्यात उडी घेते, पण तिथे एक महाकाय मगर तिच्यावर हल्ला करते.

म्हशीवर मगरीचा हल्ला 

अचानक झालेल्या या हल्ल्याने म्हैस बुचकळ्यात पडते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडते. यात ती म्हैस यशस्वी होते आणि मगरीच्या तावडीतून सुटून पाण्याबाहेर येते. ती म्हैस काठावर उभी राहते, कारण समोर दोन सिंह तिची वाट पाहत थांबलेले असतात. पुढे त्या म्हशीचे काय होते, हे यात दाखवण्यात आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल