शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: दगाबाजीचा गर्लफ्रेंडने भयानक बदला घेतला, २०००० प्रेक्षकांसमोर फायटर मॅच अन् प्रेमातही हरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:55 IST

फायटर मॅचही हरला आणि गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नाला नकार दिल्याने प्रेमातही हरला आहे. याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक फायटर मॅच हरल्यानंतर त्याच मैदानात २० हजार प्रेक्षकांसमोर त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. हा फायटर मॅचही हरला आणि गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नाला नकार दिल्याने प्रेमातही हरला आहे. याबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

एमॅटर एमएमए फायटर लुकास्झ बुकोवॅक हा नुकताच एक मॅच ०-२ ने हरला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने प्रेक्षकांसमोरच गर्लफ्रेंडला गुढघ्यावर बसून प्रपोज केला. यावर तिचे उत्तर ऐकून अनेकांच्या काळजात धस झाले होते. नेटकरी आता कोणाचे चूक, कोणाचे बरोबर याचा शोध घेत आहेत. 

फाईट हरल्यानंतर लुकास्झने गर्लफ्रेंडला रिंगणात बोलविले होते. यानंतर तिच्यासमोर त्याने गुढघ्यावर बसून अंगठी पुढे करत लग्नाची मागणी घातली. तिने त्याच्याशी लग्नाला नकार दिला. याचे कारण तो मॅच हरला हे नव्हते. तर तिने त्याला २० हजार लोकांसमोर ती नकार देत असल्याचे कारण देत उघडे पाडले. तू आपल्या नातात एकदा मला दगा दिलेला आहेस. यामुळे मी आपल्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छित नाहीय. माझ्याकडून या लग्नाला नकार आहे, असे ती म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून आधीच मॅच हरल्याचे दु:ख असलेला लुकास्झ आणखी दु:खी होऊन खाली बसला. या घटनेचा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल होऊ लागला आहे. काहीजण लुकास्झला वाईट वागल्याचे बोल लावू लागले आहेत. काहीजण लुकास्झला एक संधी द्यायला हवी असे सांगत आहेत. तर काही जण जर त्याने दगा दिला तर ती आता त्याच्यासोबत काय करतेय असेही विचारत आहेत. 

तिने नकार दिल्याचे पाहून प्रेक्षकामधून एकजण पाण्याची बॉटल घेऊन जाळ्याच्या रिंगणाबाहेरून तिच्यावर पाणी फेकताना दिसत आहे. अनेक प्रेक्षकांनी तेव्हा ती चुकीची असल्याचे म्हणत आरडाओरडा केला आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिप