शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बापमाणूस! लेकासाठी वडिलांनी सोडली पोलिसाची नोकरी; वकील बनून देताहेत लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:11 IST

वडील झांग डिंगजी यांनी आपली ट्रॅफिक पोलीस ऑफिसरची नोकरी सोडली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.

मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शाळेत पाठवलं जातं पण कधी कधी अशा काही धक्कादायक घटना त्यांच्यासोबत घडतात की ऐकून थरकाप होतो. अशीच एक भयंकर घटना चीनमधील एका व्यक्तीसोबत घडली आहे. जियांग्शी प्रांतात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला सर्वात चांगल्या शाळेत घातलं होतं. पण एक दिवस क्लास टीचर त्याला इतक्या वाईट पद्धतीने ओरडला की मुलगा फार अस्वस्थ झाला. 

मुलाने थेट शाळेच्या 24 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शिक्षकाला शाळेतून काढून टाकण्यात आल. पण त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं मुलाच्या वडिलांचं म्हणणं होतं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वडील झांग डिंगजी यांनी आपली ट्रॅफिक पोलीस ऑफिसरची नोकरी सोडली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि आता ते स्वतः त्यांचा मुलगा झांग कुआनची केस लढत आहेत. 

मुलासोबत हे कृत्य करणाऱ्या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. इतकेच नाही तर गेली दोन वर्षे झांग डिंगजी आणि त्यांची पत्नी वांग बेली हे इतर कुटुंबांना कायदेशीर मदतही करत ​​आहेत. ज्यांच्या मुलांना शाळेतील शिक्षक त्रास देत होते त्यांची केस मोफत लढत आहेत. झांग डिंगजी सांगतात, आता अशा शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर नेण्याचा माझा उद्देश आहे. जेणेकरून त्यांनी कोणाच्याही मुलांसोबत असे प्रकार करू नये. चिनी सोशल मीडियावर हे खूप व्हायरल होत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं की,  माझ्या मृत्यूशी माझे आई-वडील, समाज किंवा देशाचा काहीही संबंध नाही. याचे एकमेव कारण जू आहे, जो मला त्रास देत होता. जू झांग हा मुलाचा क्लास टीचर होता. मुलाच्या मृत्यूनंतर, पालकांनी शाळेचे सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्यांना दिसलं की जू मुलावर वारंवार अत्याचार करत होता. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जूला शाळेतून काढून टाकण्यात आलं. मात्र काही दिवसांतच त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. सुनावणीसाठी पुरेसे पुरावे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर वडील झांग डिंगजी यांनी स्वत: कायद्याचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके