Viral Video : १९९४ साली आलेल्या 'हम आपके है कौन' सिनेमातील रीमा लागू, आलोक नाथ आणि अनुपम खैर यांचं 'आज हमारे दिल मे' हे व्याही आणि विहिणीचं गाणं आजही लोकप्रिय आहे. आजही लग्नांमध्ये हे गाणं न विसरता लावलं जातं. नुकतंच एका लग्नात हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूरज बडजात्या दिग्दर्शित सिनेमात रेणुका शहाणे यांनी साकारलेल्या भूमिकेच्या लग्नात हे गाणं शूट करण्यात आलं होतं. दोन्हीकडील परिवाराच्या सदस्यांचं एक म्युझिकल कॉम्पिटिशन यात बघायला मिळतं. या गाण्याने लोकांच्या मनात एक यादगार क्षण बिंबवला आहे. आता इन्स्टाग्राम यूजर संजना रोहानीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात हर्षित आणि खुशीच्या परिवारातील सदस्य गाणं रिक्रिएट करत आनंद घेत आहेत.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एकीकडे मुलीची आई आणि काही महिला बसल्या आहेत, तर दुसरीकडे नवरदेवाचे वडील, सासरे आणि पाहुणे बसले आहेत. या परिवारातील सदस्य गाण्यावर ताल धरतानाही दिसत आहेत. लोकांना हा व्हिडीओ बघून सिनेमातील गाण्याची आठवण झाली. अनेकांनी तशा कमेंट्सही केल्या आहेत.