शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

Eye test: शोधाल तर सापडेल! या फोटोत दडलाय एक प्राणी, तुमची नजर असेल तीक्ष्ण तर दाखवा शोधुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:59 IST

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. समुद्र लाटांप्रमाणे रेषा असलेला हा फोटो आहे.

सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात (Opticall illusion photos) जे पाहून तुम्ही कन्फ्युझ होता. काही फोटो विचित्र आकार असतो किंवा विचित्र डिझाइन असते. ज्यामध्ये काही ना काही दडलेलं असतं. याला ऑप्टिकल इल्युझन असं म्हणतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. समुद्र लाटांप्रमाणे रेषा असलेला हा फोटो आहे.

या फोटोत फक्त काळ्या-पांढऱ्या रंगाच्या कोन असलेल्या रेषा दिसत आहेत (White Black lines photo showing optical illusion). तसं या फोटोत तुम्हाला काय खास दिसतं आहे असं विचारलं तर तुम्ही फक्त या रेषाच तर आहेत, यात कुठे काय खास आहे, असंच म्हणाल. पण नाही या काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये मोठा राज डला आहे. तुम्ही जर नीट आणि एका खास पद्धतीने फोटो पाहाल तर तुमच्यासमोर हा राज उलगडेल.

आता एरवी तुमच्यासमोर असा विचित्र फोटो आला की त्या फोटोकडे तुम्हाला एकटक पाहायचं असतं, तेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी वेगळं दिसतं आहे. या फोटोत तुम्ही तसं एकटक पाहिलं तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. या फोटोकडे स्थिर नजरेने पाहूच नका. तर तुमचं डोकंल हलवा (Shaking Head lets you see optical illusion). आपण जशी नकारार्थी मान हलवतो, तशीच मान तुम्हाला हलवायची. डाव्या-उजव्या बाजूला डोकं हलवायचं आहे आणि मग पाहा चमत्कार.

हळूच या काळ्या-पांढऱ्या रेषांमधील चट्टे तुम्हाला दिसतील आणि हळूहळू दोन कान आणि चेहराही दिसू लागेल. आता तुम्हाला तो चेहरा स्पष्टपणे दिसेल. दिसला हा चेहरा कुणाचा आहे. याचं उत्तर आधी तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट ब़ॉक्समध्ये नक्की द्या. या फोटोत आहे तो चक्क एक झेब्रा. काय मग तुम्हालाही तोच दिसला ना? आता या फोटोचं चॅलेंज तुम्ही तुम्ही इतरांनाही द्या. ही बातमी नक्की शेअर करा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके