शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:29 IST

Ex-MLA Viral Video: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू असलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेदरम्यान माजी आमदार उमाशंकर मुंजारे यांचा राजकीय हस्तक्षेप फसला. हेल्मेट आणि वैध कागदपत्रे नसताना दुचाकी चालवल्याबद्दल पोलिसांनी त्यांना थांबवले असता, त्यांनी पोलिस अधीक्षकांसोबत वाद घातला. मात्र, रस्ते सुरक्षा नियमांनुसार पोलिसांनी त्यांना ₹२ हजार ३०० चा दंड ठोठावला आणि त्यांची दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात नेली. एसपी आणि माजी आमदार यांच्यातील या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी बालाघाट शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट तपासणी मोहीम सुरू केली. लोकांना हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारण्यासाठी ही मोहीम सुरू आहे.  माजी आमदार उमाशंकर मुंजारे हे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असताना पोलिसांनी त्यांची बाईक थांबवली. पोलिसांनी केवळ त्यांनाच का थांबवले, सर्वांना थांबवावे, असा त्यांनी पोलिसांकडे आग्रह धरला. मुंजारे यांची इच्छा होती की पोलिसांनी त्यांना कोणतीही कारवाई न करता जाऊ द्यावे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

वाद वाढू लागताच, माजी आमदार मुंजारे यांनी पोलिस अधीक्षकांना सांगितले की, "मला कायदा शिकवू नका. मी माजी आमदार आहे. माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. माझी बाईक चोरीची आहे", असे ते म्हणाले. यावर पोलीस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी त्यांना दुचाकीचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले, पण मुंजारे यांच्याकडे हेल्मेट किंवा अन्य कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षक आदित्य मिश्रा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹२ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्यात आली.

कायदा सर्वांसाठी समान

माजी आमदार मुंजारे व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहेत की, इतरांना न थांबवता फक्त त्यांनाच दंड ठोठावण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना एसपी आदित्य मिश्रा यांनी स्पष्ट केले की, रस्ते सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत. हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली जाईल, मग ती व्यक्ती मोठी असो वा लहान. हा संपूर्ण वाद आणि झालेली कारवाई सध्या बालाघाटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-MLA's traffic stop: No papers, claims bike is stolen!

Web Summary : Ex-MLA Umashankar Munjare argued with police in Balaghat for riding without a helmet and documents. He claimed his bike was stolen. Police fined him ₹2300 and seized the vehicle. The video went viral, sparking debate on equality before the law.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल