शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! ऑफिसच्या सुरक्षा रक्षकाला कर्मचाऱ्यांनी दिलं स्पेशल सरप्राईज; पाहताच पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 15:24 IST

एक छोटीशी कृती कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते.

वाढदिवस हा खरंच प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो. तो आणखी खास होतो जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आनंदात, मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतात. पण अनेकदा अभ्यास, काम किंवा व्यवसायामुळे राहण्याच्या ठिकाणाहून बाहेर जावे लागते. जबाबदाऱीमुळे आणि पैसे कमावण्यासाठी खास प्रसंगी आणि सणांना घरी परतणे खूप कठीण होऊन बसते. वाढदिवस असतानाही काही जण कामावर असतात. 

काही वेळा काम तुम्हाला तुमच्या गावापासून दूर राहण्यास भाग पाडते. अशा वेळी तुमचा बर्थडे सेलिब्रेट करण्‍यासाठी कुणी प्रयत्न केले तर खूप बरं वाटतं. तो कोणीही असू शकतो, तुमचा शेजारी किंवा तुमच्या ऑफिसमधील सहकारी. तब्बल आठ वर्षांनंतर कार्यालयातील कर्मचारी गटाने एका सुरक्षा रक्षकाचा वाढदिवस साजरा केला. हा क्षण पाहिल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला. एक छोटीशी कृती कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते हे समजतं.

वर्ल्ड ऑफ बझच्या रिपोर्टनुसार, व्हायरल क्लिप आता टिकटॉकवरून हटवण्यात आली आहे. मलेशियातील एका कार्यालयात आठ वर्षे काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला घरी परतण्याची संधी मिळाली नाही. व्हिडिओनुसार तो दरवर्षी एकटाच वाढदिवस साजरा करत असायचा. त्याने कमावलेल्या पैशातील काही भाग त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबासाठी पाठवणे ही त्यांची एकमेव जबाबदारी होती. 

कर्मचारी सुरक्षा रक्षकाला कार्यालयाच्या परिसरात बोलावताना दिसतं. त्याने एंट्री घेताच सर्व त्याच्याभोवती हॅपी बर्थडे गाणं गाऊ लागले. हे पाहून सुरक्षा रक्षकाला आपले अश्रू अनावर झाले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा रक्षकाला वाढदिवसाचा केक आणून एक तुकडा खाऊ घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. भारतात टिकटॉकवर बंदी आहे. यामुळे व्हिडिओही पाहता येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल